राज्यात 335 कोरोना बाधित रुग्ण, 13 मृत्यू; 41 रुग्णांना उपचारानंतर घरी सोडले – आरोग्यमंत्री राजेश टोपे

1234

 राज्यात आज कोरोना बाधित 33 नवीन  रुग्णांची नोंद झाली. यातील 30 रुग्ण मुंबईचे, पुणे येथील 2 तर बुलढाण्याच्या एका रुग्णाचा समावेश आहे. यामुळे राज्यातील एकुण बाधित रुग्णांची संख्या 335 झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आज राज्यात कोरोना मुळे 3 मृत्यूंची नोंद झाली. यातील दोन मृत्यू मुंबईत झाले असून त्यापैकी एक 75 वर्षीय पुरुष आहे तर दुसरा 51 वर्षीय पुरुष आहे. याशिवाय 50 वर्षीय पुरुषाचा मृत्यू एक मृत्यू पालघर येथे झाला आहे. या तिन्ही रुग्णांनी कोठेही परदेशी प्रवास केल्याचा इतिहास नाही. आतापर्यंत  राज्यात करोनामुळे एकूण 13 मृत्यू झाले आहेत.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय पॉझीटिव्ह आढळलेल्या रुग्णांचा तपशील:-

मुंबई                                181

पुणे ( शहर व ग्रामीण भाग ) 50

सांगली                             25

मुंबई वगळून ठाणे मंडळातील मनपा  36

नागपूर                             16

यवतमाळ                           4

नगर                         8

बुलढाणा                         4

सातारा, कोल्हापूर  प्रत्येकी   2

संभाजीनगर, रत्नागिरी,  सिंधुदुर्ग, गोंदिया, जळगाव,  नाशिक प्रत्येकी        1

इतर राज्य – गुजरात 1

एकूण 335 त्यापैकी 41 जणांना घरी सोडले तर  13 जणांचा मृत्यू

राज्यात आज एकूण 705 जण विविध रुग्णालयात भरती झाले आहेत.  आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 7126 नमुन्यांपैकी 6456 जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर 335 जण पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत 41 कोरोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात 24 हजार 818 व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून 1828 जण संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या