
मुंबईच्या पश्चिम उपनगरांत सर्व सुविधांनी सुसज्ज असे शासकीय रुग्णालय नसल्याने रुग्णांना उपचारांसाठी केईएम किंवा सायन रुग्णालयात जावे लागत असल्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी आज विधानसभेत मान्य केले.
मालाड मालवणी येथे मल्टिस्पेशालिटी रुग्णालय सुरू करण्याबाबत योगेश सागर यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर मालाड मालवणी येथील जनकल्याण नगर येथील साठ खाटांच्या रुग्णालयामार्फत प्रसूतिगृह, डायलिसिस सेंटर, नवजात शिशूचे लसीकरण, प्राथमिक उपचार तसेच अपघात विभाग, शस्त्र्ाक्रिया, दंतचिकित्सा सेवा, एक्स-रे, प्रयोगशाळा, रुग्णवाहिका सेवा पुरवण्यात येत असल्याचे लेखी उत्तरात नमूद केले आहे.