हिंदुस्थानात अजूनही कोरोनाच्या सामूहिक संसर्गाला सुरुवात नाही, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती

712

जगभरात हाहाकार उडवून दिलेल्या कोरोना व्हायरसचा प्रसार हिंदुस्थानातही वेगाने होत आहे. गेल्या 24 तासांत देशात 678 नवीन रुग्ण वाढले असून देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची एकूण संख्या 6412 झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच देशात अजूनही कोरोनाच्या सामूहिक संसर्गाची सुरुवात झाली नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल पुढे म्हणाले की, देशात गेल्या 24 तासांत कोरोना व्हायरसमुळे 33 मृत्यू झाले आहेत. कोरोनामुळे झालेल्या मृतांचा आकडा 199 झाला आहे. तर 503 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत, असेही ते म्हणाले.

अमेरिकेला मदत, मग आपले काय?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी विनंतीवजा धमकी दिल्यानंतर हिंदुस्थानने अमेरिकेला हायड्रॉक्सिक्लोरोक्विन या औषधाचा पुरवठा केला होता. यानंतर देशातील रुग्ण वाढत असताना औषधांचा असा पुरवठा करणे कितपत योग्य असा सवाल उपस्थित केला जात होता. याला लव अग्रवाल यांनी उत्तर दिले. मलेरियासाठी वापरण्यात येणाऱ्या तसंच काही अपवादात्मक स्थितीत कोरोना व्हायरसग्रस्तांच्या उपचारांसाठी वापरण्यात येणाऱ्या हायड्रॉक्सिक्लोरोक्विन या औषधाचा पुरेसा साठा देशात उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

कोरोनामुळे 1 लाख जणांचा मृत्यू
दरम्यान कोरोना व्हायरसने आतापर्यंत जगातील 96 हजार जणांचा बळी घेतला आहे. जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या आकडेवारीतून हे समोर आलं आहे. इटलीत 18,300, अमेरिकेत 16,686 आणि स्पेनमध्ये 15,447 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हा आकडा मोठा असू शकतो, कारण अनेक देशांनी हॉस्पिटलबाहेरील मृत्यूंचा यात समावेश केलेला नाही

आपली प्रतिक्रिया द्या