#Corona दारू पिऊ नका नाहीतर… आरोग्य मंत्रालयाचा इशारा

2654

देशभरात लॉकडाऊनमुळे वाईन शॉप, बिअर बार देखील बंद असल्यामुळे तळीरामांचे वांदे झाले आहेत. अनेकजण दारूची दुकाने काही काळासाठी तरी सुरू करा अशी मागणी करत आहेत. असे असतानाच आरोग्य मंत्रालयाने मात्र दारू पिणाऱ्यांना दारू पिऊ नका असा इशारा दिला आहे.

‘दारू प्यायल्याने, तंबाखू खाल्ल्याने अनेकांना आपला ताणतणाव दूर होईल असे वाटत असेल पण या लॉकडाऊनमध्ये दारू पिणे, तंबाखू खाणे धोकादायक ठरू शकते. या व्यसनामुळे तुमची प्रतिकारक क्षमता कमी होऊ शकते. कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी आपल्या शरीराची प्रतिकारक क्षमता चांगली असने अत्यंत गरजेचे आहे’, असा इशारा आरोग्य विभागाने मंगळवारी दिला आहे.

‘स्वत:ला नकारात्मक विचारापासून दूर ठेवण्यासाठी गाणी ऐका, वाचन करा, टीव्हीवर काही मजेशीर कार्यक्रम बघा. तुम्हाला जर चित्रकला, बागकाम, शिवनकाम असे काही छंद असतील तर ते छंद पुन्हा एकदा जोपासण्यासाठी तुम्हाला वेळ मिळाला आहे’, असे आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे. कोवीड-19 शी लढा देण्यासाठी मंत्रालयाने ‘मायडिंग अवर माईंड्स ड्युरिंग कोविड 19 पॅन्डमिक’ ही पुस्तिका तयार केली आहे. त्यात त्यांनी हा सल्ला दिला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या