आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या ‘आयुष’ मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ अरुण भस्मे

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या ‘आयुष’ मंडळाचे अध्यक्ष म्हणून डॉ.अरुण भस्मे यांची निवड करण्यात आली आहे. भस्मे हे बीड येथील सोनाजीराव क्षीरसागर होमिओपॅथी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य आहेत. कुलगुरू डॉ.दिलीप म्हैसेकर यांनी ही निवड केली आहे. या मंडळावर होमिओपॅथी विद्याशाखेतून पुणे येथील भारती विद्यापीठाच्या होमिओपॅथी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण जाधव, नाशिक येथील मोतीवाला होमिओपॅथी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.फारूक मोतीवाला, फोस्टर होमिओपॅथी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.अनुपमा पाथ्रीकर यांची सदस्य म्हणून निवड झाली आहे. माजी मंत्री जयदत क्षीरसागर, नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर, होमिओपॅथी कालेज फेडरेशनचे अध्यक्ष आमदार विक्रम काळे, सचिव पृथ्वीराज पाटील, डॉ.गजाननराव पोळ,होमिओपॅथी चे अधिष्ठाता डॉ.डी बी बागल, डॉ.कवीश्वर,डॉ.मालोकर,डॉबाळासाहेब पवार यांनी डॉ.भस्मे यांचे अभिनंदन केले.

आपली प्रतिक्रिया द्या