Health tips – रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारं गुणकारी आलं, जाणून घ्या 10 फायदे

मसाल्यात, जेवणात, चहात, आयुर्वेदिक काढ्यात वापरले जाणारे आलं (अद्रक) रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी महत्वाचे आहे. सर्दी, खोकला यासह अपचन यावर आलं उपयुक्त असून यात असणाऱ्या पोषण तत्वांमुळे आलं आरोग्य वर्धकही आहे. जाणून घेऊ गुणकारी आल्याचे फायदे…

1. आलं औषधी असून यातील फेनोलिकमुळे अपचन तसेच जळजळ याला आराम मिळतो. यासह पित्त होण्यापासून रोखले जाते.

2. आलं वेदनाशामक, तापमान कमी करणारे आहे. आल्यामुळे तोंडात लाळेची निर्मिती जास्त प्रमाणात होते. त्यामुळे घास गिळायला सोपे जाते.

3. आलं पाचक, सारक व भूक वाढविणारे आहे. पित्ताने चक्कर आली वा मळमळत असेल, उलटीसारखे वाटत असेल तर आल्याचा रस साखर व मिठाबरोबर घ्यावा.

Health – भिजलेले शेंगदाणे खाण्याचे आश्चर्यकारक फायदे माहिती का? जाणून घ्या

4. सर्दी व कफावर तुळशीच्या पानांबरोबर आल्याचा किस उकळून प्यावा. सांधेदुखीवर आल्याचा काढा देतात वा एरंडेल तेलाबरोबर सुंठीची चिमूट नियमाने घ्यावी.

5. रक्त पातळ करण्यासाठी आल्याचा उपयोग होता. ज्यांना पित्ताशयातील खडे त्रास देत असतील त्यांनी आले खाऊ नये.

6. आल्यात मॅग्नेशियम, पोटॅशियम, लोह व झिंक(अल्प प्रमाणात) आहेत. क, ब 3  व ब 6 ही जीवनसत्वे असल्याने जेवणानंतर पोटात गॅस झाला तरी आल्याचे चाटण चाटावे.

Health Tips – झोपण्यापूर्वी ‘या’ 7 गोष्टींचे सेवन चुकूनही करू नका, आताच व्हा सावधान

7. आल्याचा रस व मध सम प्रमाणात दोन-दोन चमचे दोन वेळा घेतल्यास सर्दी, खोकला पडसे व स्वरभंग बरे होतात.

8. अजीर्ण झाल्यास आल्याचे रसात लिंबाचा रस व मीठ घालून पाणी प्यावे.

9. आलं व तुळशीचा काढा सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखीवर औषधी ठरतो.

10. आलं खाताना तिखट असले तरी पोटात गेल्यावर गोड होते. यामुळे पोटदुखी, मळमळ यासारखे त्रास कमी होतात.

Health Tips – गुळाचा चहा पिण्याचे 7 फायदे जाणून घ्याल तर थक्क व्हाल

आपली प्रतिक्रिया द्या