हातापायाला मुंग्या

सामना ऑनलाईन । मुंबई

एकाच जागेवर बराच वेळ बसल्याने किंवा हातापायाच्या एखाद्या शिरेवर दाब आल्याने हातपाय सुन्न होतात. त्यालाच मुंग्या येणे म्हणतो, पण या मुंग्या नेमक्या कशामुळे येतात त्याची नेमकी कारणे जाणून घेऊ या.

– शरीरात व्हिटॅमिन बी १२ची कमतरता असेल तर हातापायाला मुंग्या येतात. त्यामुळे वारंवार थकल्यासारखं वाटणं, सारखा कंटाळा येणं, आळस येणं असं वाटत राहतं.
– तासन्तास संगणकावर टायपिंग करत राहिल्याने मनगटाच्या नसा आकुंचित होऊन हाताला मुंग्या येतात, पण फिजिओथेरपिस्टच्या मदतीने वा योग्य व्यायामाने बरे वाटते.
– मानेची नस आखडली असेल तर पाठीपासून पायापर्यंत आणि मानेपासून हातापायापर्यंतच्या भागांना मुंग्या येतात. बसण्याची चुकीची पद्धत आणि दुखापतीमुळे मान आखडली जाते.
– मधुमेही रुग्णांना हातापायाला मुंग्या येण्याचा त्रास होत असतो. त्यामुळे या रुग्णाच्या हातापायांना मुंग्या येतात, पण याबरोबरच खूप भूक किंवा तहान लागत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
– हायपरथायरॉईझम असलेल्यांना हा त्रास जाणवू शकतो. त्यांच्या थायरॉईड ग्रंथी निक्रिय असल्यास थकवा येणे, वजन वाढणे हा त्रास जाणवू लागतो, पण हायपरथायरॉईझम आहे की नाही हे पाहण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने रक्ताची चाचणी करणे आवश्यक आहे.

आपली प्रतिक्रिया द्या