गुणकारी दही

1865

> केस सुंदर, स्वच्छ आणि निरोगी राहण्यासाठी दही किंवा ताकाचा वापर करा. कारण केसांसाठी आवश्यक असलेली सर्व तत्त्वे दह्यात असतात. आंघोळीपूर्वी केसांना दह्याने मसाज करा. मुळांपर्यंत दही लागायला हवे. काही वेळाने केस धुवा. असे केल्याने केसातील कोंडा नष्ट होईल.

> जेव्हा केस कोरडे आणि निर्जीव होतात तेव्हा केसांना दही लावावे. ते उत्तम कंडिशनरचे काम करते. केसांच्या मुळांशी १५ ते २० मिनिटे दही लावून ठेवा. त्यानंतर केस धुवा. यामुळे कोंडा आणि केसांचा रुक्षपणा, कोरडेपणा नष्ट होऊन केस मुलायम, चमकदार होतील.

> दह्याने मसाज केल्याने त्वचा मुलायम होते. चमकदार चेहऱयासाठी दह्यात बेसन पीठ मिसळून चेहऱ्याला लावा.

> दह्यात बेसन पीठ, चंदन पावडर आणि चिमूटभर हळद मिसळून उटण्याप्रमाणे त्वचेला लावा. सुकल्यानंतर धुवून टाका. त्वचा तुकतुकीत, कांतीमान होऊन तिला स्निग्धता मिळेल.

> मेंदीत दही मिसळून केसांच्या मुळांशी लावल्याने कोंडा निघून जातो. कारण दह्यात नैसर्गिकतः केसांसाठी आवश्यक असलेले कंडिशनरचे गुणधर्म आहेत. दही कशातही न मिसळता केसांना लावले तरी चालते.

आपली प्रतिक्रिया द्या