Health – प्रतिकारशक्तीच नाही तर लैंगिक क्षमताही वाढवते ही आयुर्वेदिक वनस्पती, जाणून घ्या फायदे-तोटे

अश्वगंधा या वनस्पतीचे शास्त्रीय नाव विथानिया सोम्नीफेरा असून यास विंटर चैरी आणि इंडियन गिनसेंग या नावाने देखील संबोधले जाते. हिंदुस्थान आणि आफ्रिकेत आढळणाऱ्या या आयुर्वेदिक वनस्पतीचे नाव कोरोना संकटकाळात तुम्ही ऐकले असेल. प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अश्वगंधा उपयुक्त असल्याचे निदर्शनास आले. अश्वगंधा वनस्पती फक्त प्रतिकारशक्ती वाढवण्यास नाही तर लैंगिक क्षमता वाढवण्यासाठीही उपयुक्त असल्याचे असल्याचे निदर्शनास आले आहे.

जाणून घ्या फायदे-तोटे

1. अश्वगंधा रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी मदत करते.

2. यात अँटी ऑक्सिडेंट्स आणि अँटी बॅक्टेरियल गुणतक्त असल्याने प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.

3. अश्वगंधा कर्करोग रोखण्यासाठीही महत्त्वाची भूमिका निभावते. अनेक संशोधनात अश्वगंधा कर्करोगाच्या पेशींची वाढ आणि निर्मिती रोखते हे स्पष्ट झाले आहे.

4. मासिक पाळीच्या काळात अंगावरून पांढरे पाणी जाण्याची समस्या असणाऱ्या महिलांसाठी अश्वगंधा उपयुक्त ठरते.

Health – ‘या’ पाच गोष्टींचे सेवन केल्याने प्रतिकारशक्ती होते क्षीण, झोपण्यापूर्वीची ‘ही’ सवय सर्वात घातक

5. महिला आणि पुरुषांमध्ये फर्टिलिटीला प्रोत्साहन देण्यासाठी, तसेच स्पर्म क्वालिटी सुधारण्यास मदत करते.

6. हायपरटेन्शनमध्येही अश्वगंधा प्रभावी ठरते. त्यामुळे याचे नियमिय सेवन करावे.

7. ज्या लोकांना कमी रक्तदाबाचा त्रास आहे त्यांनी अश्वगंधाचे सेवन करू नये.

Health Tips – नैसर्गिकरित्या वाढवा प्रतिकारशक्ती, ‘या’ पाच गोष्टींचे करा रोज सेवन

8. ज्या लोकांना नीट झोप येत नाही त्यांनी रात्री झोपण्यापूर्वी दुधासोबत अश्वगंधाचे सेवन करावे. तसेच पोटाच्या विकारांवर अश्वगंधा रामबाण उपाय आहे.

9. लैंगिक क्षमता वाढवण्यास आणि लैंगिक सुखाचा आनंद घेण्यासाठी अश्वगंधाचे सेवन करावे.

10. अश्वगंधाचे सेवन कमी प्रमाणात (डॉक्टरांनी ठरवून दिलेल्या प्रमाणात) करावे. याच्या अति सेवनामुळे ओकारी येणे, पोट खराब होणे यासारख्या समस्या होऊ शकतात.

(टीप – कोणत्याही औषधांचे सेवन डॉक्टरांच्या सल्ल्याने करावे)

आपली प्रतिक्रिया द्या