Health – तुम्हालाही झोपण्याच्या, बसण्याच्या ‘या’ चुकीच्या सवयी तर नाहीत ना?, जाणून घ्या अन्यथा…

3142

मानवाच्या शरीरातील सर्वात महत्वाचा अवयव म्हणजे पाठ. बसताना, उठताना, झोपताना पाठीच्या कण्यावर ताण पडतो. अनेकदा चुकीच्या झोपण्याच्या, बसण्याच्या सवयीमुळे पाठदुखी आणि कंबरदुखीला आपसूक आमंत्रण मिळते. यामुळे वेदनाही होतात आणि दुर्लक्ष केल्यास याचा गंभीर परिणामही होऊ शकतो. तसेच ताणतणाव, जाडेपणा हे देखील यास कारणीभूत आहे. त्यामुळे याकडे वेळीच लक्ष देणे आवश्यक असून काही सवयी बदलणे गरजेचे आहे.

झोपण्याच्या चुकीच्या सवयी
झोपण्याच्या चुकीच्या पद्धती पाठदुखी, कंबरदुखी, मानदुखी यासारख्या समस्यांना आमंत्रण देतात. वाकडे-तिकडे झोपणे, एकाच पोझिशनमध्ये बराच वेळ पडून राहणे, गादी व्यवस्थित नसणे यामुळे अनेक समस्या होतात. त्यामुळे डॉक्टर आणि तज्ज्ञांचा सल्ला घेऊन झोपण्याच्या सवयी बदल आणि पाठदुखी, कंबरदुखीपासून आराम मिळवा.

Health Tips – लैंगिक क्षमतेवर होतो वाईट परिणाम, ‘या’ सवयी आत्ताच सोडा

खुर्चीवर बसण्याची पद्धत
आजकाल मोबाईल, लॅपटॉप यावर काम करावे लागत असल्याने अनेक जण तासंतास खुर्चीवर एकाच पोझिशनमध्ये बसून राहतात किंवा झुकून काम करतात. यामुळे पाठदुखी, कंबरदुखी बळावते. त्यामुळे योग्य पोझिशनमध्ये बसा आणि थोड्याथोड्या वेळाने उठून 5 मिनिटं चक्कर मारून या.

Health Tips – नैसर्गिकरित्या वाढवा प्रतिकारशक्ती, ‘या’ पाच गोष्टींचे करा रोज सेवन

कडक उशी
अनेकांना झोपताना डोक्याखाली मोठी उशी किंवा कडक उशी घेण्याची सवय असते. मात्र यामुळे मानदुखी आणि पाठदुखीचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे पाठदुखीचा त्रास असेल तर डॉक्टर जमिनीवर चटई टाकून झोपण्याचा सल्ला देतात.

Health – ‘या’ पाच गोष्टींचे सेवन केल्याने प्रतिकारशक्ती होते क्षीण, झोपण्यापूर्वीची ‘ही’ सवय सर्वात घातक

ताणतणाव आणि जाडेपणा
जे लोक अधिक ताणतणाव असतात त्यांना कंबरदुखीचा सामना करावा लागतो असे समोर आले आहे. तसेच जाडेपणा देखील कंबरदुखीला आमंत्रण देतो. ताणतणाव कमी करण्यासाठी प्राणायम करण्याचा सल्ला देण्यात येतो, तर जाडेपणा कमी करण्यासाठी आहारावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला मिळतो.

Health Tips – झोपण्यापूर्वी खजूर खाण्याचे ‘हे’ 8 फायदे जाणून घ्याल तर आश्चर्यचकित व्हाल

कमकुवत हाडे
कमकुवत हाडांमुळे देखील पाठदुखीचा त्रास जाणवू शकतो. यासाठी कॅल्शियमयुक्त आहार घ्यावा. दूध, अंडी यांचा आहारात समावेश करावा. तसेच प्राणायम आणि योगासने करणे आवश्यक आहे.

Health – प्रतिकारशक्तीच नाही तर लैंगिक क्षमताही वाढवते ही आयुर्वेदिक वनस्पती, जाणून घ्या फायदे-तोटे

आपली प्रतिक्रिया द्या