Health tips – एक चमचा कोरफड आयुष्य बदलेल, जाणून घ्या 9 आरोग्यदायी फायदे

कोरफड अत्यंत गुणकारी अशी औषधी वनस्पती आहे. घराच्या गच्चीवर, परसबागेत किंवा अगदी बाल्कनीमध्येही कुंडीत ही बहुगुणी वनस्पती आपण लावू शकतो. त्वचा आणि केसाच्या समस्येवर कोरफडीचा रस लावल्यास त्याचे अनेक फायदे आहेत. साबण, सौंदर्यप्रसाधने आणि शाम्पूमध्ये कोरफडचा वापर केला जातो. त्यामुळे जाणून घ्या, बहुगुणी कोरफडीचे आरोग्यदायी फायदे

1. तजेलदार त्वचा आणि सुंदर केसांसाठी कोरफड अत्यंत उपयुक्त आहे.

2. कोरफडीच्या रसामध्ये जीवनसत्वे आणि खनिजे मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळेच दररोजच्या आहारात एनर्जी ड्रिंक म्हणून रसाचा समावेश केल्यास शरीराला पोषक घटकांचा पुरवठा होतो. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

3. हिवाळ्यात बऱ्याचदा सर्दी, खोकला होण्याचा धोका असतो. सर्दी आणि खोकल्यावर सुरक्षित आणि प्रभावी घरगुती उपाय म्हणूनही कोरफडीचा वापर केला जातो.

Health tips – रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारं गुणकारी आलं, जाणून घ्या 10 फायदे

4. कोरफडीचा रस पचनक्षमता वाढवते. तसेच कोरफडीच्या रसामुळे पित्ताचा त्रास कमी होण्यासही मदत होते. यामुळे पचनशक्ती वाढते.

5. कोरफडीचा रस वजन कमी करण्यासही मदत करतो. कोरफडीच्या रसामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते आणि चयापचय क्रिया सुरळीत होते.

6. कोरफडीच्या रसाचे सेवन केल्यास संधिवाताच्या वेदना कमी होण्यास मदत होते.

Health tips – रोज फक्त 1 लवंग खा, ‘या’ 8 समस्यांपासून आराम मिळवा

7. कोरफडीचा रस मधुमेहावरही अत्यंत गुणकारी आहे. यामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होते.

8. कोरफडीमध्ये अँटि-फंगल गुणधर्म असतो. त्यामुळे योनी मार्गाजवळ झालेल्या इंन्फेक्शनमुळे होणारी जळजळ, खाज व दाह कमी होण्यास मदत होते.

9. कोरफडीचा रस प्यायल्याने दातांचे सुधारते. यामुळे हिरड्यांना आलेली सूज कमी होते. तोंड आले असल्यास कोरफडीचा रस लावल्याने आराम मिळतो.

Health Tips – आवळा रस अनेक आजारांवर आहे गुणकारी, जाणून घ्या 7 फायदे

आपली प्रतिक्रिया द्या