Tips – वीर्यवर्धक आवळा आहे अनेक आजारांवर गुणकारी, जाणून घ्या 7 फायदे

पोषणमुल्यांचा खजिना असलेल्या आवळ्याचे आयुर्वेदात विशेष महत्व आहे. विविध आजारात आवळ्याचा वापर केला जातो. आवळ्यात ‘व्हिटॅमिन सी’चे प्रमाण जास्त असते. आवळा ज्यूस, आवळ्याचे लोणचे, आवळा कॅण्डी, आवळा पावडर अशा विविध रुपात आपण याचे सेवन करू शकतो. याच्या सेवनाने अनेक आजारांवर नियंत्रण मिळवता येते. जाणून घेऊया 7 फायदे –

1. आवळ्याचा रस खोकला आणि तापासह तोंडातील पांढरे चट्टे यावर नियंत्रण मिळवण्याचे काम करतो. दोन चमचे आवळा रसात दोन चमचे मध एकत्र करून याचे सेवन केल्यास सर्दी आणि खोकला यावर नियंत्रण राहते, तसेच तोंड आले असल्यास आवळ्याच्या रसात पाणी मिक्स करून गुळण्या केल्यास आराम मिळतो.

2. नियमित आवळा ज्यूसचे सेवन केल्याने कोलेस्टेरॉलवर नियंत्रण राहते आणि शरीर निरोगी बनते. यात असणाऱ्या
एमिनो एसिड आणि एंटीऑक्सीडेंट गुणतत्व यामुळे हृदय मजबूत होते.

3. आवळा रस श्वसनाचा (दमा) आजार असणाऱ्या रोग्यांसाठी उपयुक्त आहे. तसेच मधुमेहावर नियंत्रण राखता येते. यासह यकृत स्वस्थ होऊन पचनशक्ती वाढते.

4. रक्तशुद्धीकरण व रक्ताभिसरणातही आवळा गुणकारी असून विर्याचा स्रोत आहे. तसेच आवळ्याचा रस सेवन केल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते.

Food Tips – उन्हाळ्यात घरच्याघरी झटपट बनवा ‘ही’ सरबतं, शरीर ठेवतील थंड

5. व्हिटॅमिन सी व्यतिरिक्त आवळ्याच्या लोह, कॅल्शियम आणि फॉस्फरस याचे प्रमाण जास्त असते. यामुळे तसेच त्रिदोष (वात, कफ आणि पित्त) दूर करण्यास मदत होते. न्यूट्रिशन ड्रिंक प्रमाणे याचा वापर होतो.

6. केसांसाठी आवळा एखाद्या औषधाप्रमाणे काम करतो. आवळ्यात असणाऱ्या अमीनो एसिड आणि प्रोटीन केसांच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहेत. केस गळती रोखण्यात आवळा हातभार लावतो.

पुरुषही 40व्या वर्षी दिसू शकतात चिरतरुण, अशी घ्या त्वचेची काळजी

7. आवळा ज्यूस चेहरा तजेलदार बनवण्यासाठी फेसपॅक प्रमाणे वापरता येतो. आवळा रस चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावरील काळे डाग, मुरूम यापासून पिच्छा सुटतो आणि चेहरा ताजातवाना होतो.