Health Tips – गुळाचा चहा पिण्याचे 7 फायदे जाणून घ्याल तर थक्क व्हाल

‘साखरेचे खाणार त्याला देव नेणार’, असे आपल्याकडे बोलले जाते. त्यामुळे आजही ग्रामीण भागात साखरेपेक्षा गुळाचा वापर जास्त केला जातो. गुळात सारखेहून अधिक न्यूट्रिएंट्स असतात. थंडीच्या दिवसात गूळ खाणे चांगले असते असेही बोलले जाते. तसेच गूळ खाण्याचे आणि गुळाचा चहा पिण्याचे अनेक फायदे आहेत. जाणून घेऊया…

सर्दी, पडसे, खोकल्यावर प्रभावी
थंडीच्या दिवसांमध्ये गुळ खाणे चांगले असते. गुळामुळे थंडीपासून संरक्षण होते. सर्दी आणि खोकला झाल्यास आजही घरातील जुनी लोकं गुळ आणि हळद खाण्याचा सल्ला देतात. किंवा दुधामध्ये गुळ आणि हळ मिसळून पिण्याचा सल्ला देतात

मुरुमाची समस्या
जास्त तेलकट खाल्ल्याने, धुळीमुळे किंवा पित्ताचा त्रास असल्यास चेहऱ्यावर मुरूम येतात. मात्र रोज थोडा गूळ खाल्ल्यास ही समस्या कमी होण्यास मदत होते.

Health – भिजलेले शेंगदाणे खाण्याचे आश्चर्यकारक फायदे माहिती का? जाणून घ्या

ऍनिमिया
गुळात लोह खनिज जास्त असल्याने रोज सकाळी पाण्यासोबत याचे सेवन केल्यास ऍनिमियाचा त्रास कमी होतो.

एनर्जी देण्याचे का
थकवा जाणवत असल्यास किंवा ऊन लागल्यास गुळाच्या चहाचे सेवन केल्याने आराम मिळतो आणि शरीराला एनर्जी देण्याचे काम गूळ करतो.

Health Tips – आवळा रस अनेक आजारांवर आहे गुणकारी, जाणून घ्या 7 फायदे

पचनक्रिया सुधारते
गुळामुळे पचनक्रिया सुधारते. तसेच दम्याचा त्रास असल्यास गूळ खाल्ल्याने आराम मिळतो. यामुळे शरीराचे तापमानही नियंत्रणात राहते.

घशाला आराम
घसा खवखवत असल्यास किंवा घसा बसल्यास गूळ खाल्ल्याने आराम मिळतो.

Health Tips – झोपण्यापूर्वी खजूर खाण्याचे ‘हे’ 8 फायदे जाणून घ्याल तर आश्चर्यचकित व्हाल

हिमोग्लोबिन वाढते
रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी गुळाचा चहा पिणे फायदेशीर ठरते.

Health Tips – नैसर्गिकरित्या वाढवा प्रतिकारशक्ती, ‘या’ पाच गोष्टींचे करा रोज सेवन

आपली प्रतिक्रिया द्या