Health Tips – मनुके खाण्याचे 5 फायदे जाणून घ्याल तर रोज सेवन कराल

7529

गोड शिऱ्यात, खीरमध्ये घातले जाणारे, लाडूच्या सजावटीसाठी वापरले जाणारे मनुके प्रत्येकाच्या घरात असतातच. सुक्या मेव्यातील एक असणारे मनुके खायला आंबट-गोड असतात. आयुर्वेदात मनुक्याला विशेष स्थान असून पोटाच्या विकारांवर हे प्रभावी ठरतात. मनुक्यात मोठ्या प्रमाणात फायबर, अँटी ऑक्सिडेंट, अँटी मायक्रोबियल प्रॉपर्टी असते तसेच झिंक आणि आयर्न हे देखील असते.

जाणून घेऊया फायदे –

1. मनुके पोटाच्या विकारांवर उपयुक्त आहेत. यात फायबर असल्याने पोटदुखी, जुलाब यावर प्रभावी ठरते. 7 ते 8 मनुक्याचे बी काढून एक ग्लासभर दुधात टाकून उकळून घ्यावे आणि याचे सेवन करावे.

screenshot_2020-08-05-15-51-24-793_com-android-chrome

2. मनुके थंड प्रवृत्तीचे असल्याने ऍसिडिटी अर्थात पित्ताचा त्रास कमी करण्यासाठी आणि दाहकता कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात. 4 मनुके 10 मिनिटांसाठी पाण्यात भिजवून ठेवावे आणि चावून खावे. सोबत दुधाचे सेवनही करू शकता, यामुळे आराम मिळेल.

images-1

3. ‘अमेरिकन जर्नल ऑफ क्लीनिकल न्यूट्रीशन’ने केलेल्या संशोधनानुसार मनुके खाल्ल्याने रक्तातील नायट्रिक ऑक्सीडचे प्रमाण वाढते, तसेच कमी रक्तदाबाचा त्रास असल्यास मनुके फायदेशीर ठरतात. रात्री 5 ते 8 मनुके एक ग्लासभर पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी हे पाणी प्यावे आणि मनुके चावून खावेत. दर दोन दिवसांनी असे केल्याने रक्त दाबाचा त्रास नियंत्रणात राहतो.

images

4. मनुक्यात लोह (आयर्न) खनिज जास्त प्रमाणात असल्याने रक्तातील हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते. महिलांनी यासाठी याचा आहारात जरूर समावेश करावा. रात्रभर भिजवलेले मनुके सकाळी चावून खाल्ल्याने ऍनिमिया वर प्रभावी ठरतात.

screenshot_2020-08-05-15-46-04-389_com-android-chrome

5. मनुक्यात अँटी ऑक्सिडेंटचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात असल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यास मदत होते, तसेच यामुळे त्वचा टवटवीत होते. तसेच याचा वापर फेस पॅक म्हणूनही करू शकता. यासाठी 10 ते 12 मनुक्याची पेस्ट तयार करा आणि त्यात एक चमचा।मध एकत्र करून चेहऱ्यावर लावा. हाताचे मसाज करा आणि नंतर धुवून टाका.

Health Tips – नैसर्गिकरित्या वाढवा प्रतिकारशक्ती, ‘या’ पाच गोष्टींचे करा रोज सेवन

या गोष्टी लक्षात ठेवा

– हाय ब्लड प्रेशरचा त्रास असल्याचे डॉक्टरांच्या सल्ला घेऊनच सेवन करा.
– मनुके प्रमाणात खावेत. जास्त प्रमाणात खाल्ल्याने जुलाब होऊ शकतात.

Health – ‘या’ पाच गोष्टींचे सेवन केल्याने प्रतिकारशक्ती होते क्षीण, झोपण्यापूर्वीची ‘ही’ सवय सर्वात घातक

आपली प्रतिक्रिया द्या