दिवाळीसाठी व्हा तयार! फिट राहण्यासाठी वापरा खास फंडे

2567

दिवाळी आता अवघ्या काही दिवसांवर आली असून सर्वांनाच खमंग शेव, चिवडा, लाडू-चकल्या खायचे वेध लागले आहेत. अनेक घरांमध्ये दिवाळीच्या फराळाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून लाडू-चकलीचा घमघमाट सुटला आहे. अशा वेळी तोंडाला पाणी सुटले नाही तर नवलच… पण यावेळी आड येते ते डाएट. पण आता काळजी करू नका, काही खास फंडे वापरून दिवाळीतही फिट राहू शकता.

– दिवाळी म्हटले की गोड-धोड आणि तेलकट पदार्थ आलेच. अशावेळी मोह टाळा आणि अति खावू नका. हवं ते खा, पण प्रमाणात.

– आपल्याला अमूक एक गोष्ट आवडते म्हणून ती तोंडात कोंबू नका. एकच गोष्ट अति खाणे टाळा. चवीपुरतं पण समाधानकारक खा.

ladoo

– तेलकट-तुपकट खायचे असेल तर त्याला भाज्यांचीही जोड द्या, जेणेकरून पचनास सोपे जाईल.

– दिवसातून आठ ते दहा ग्लास पाणी प्या आणि भरपूर सलाड खा

– गोड काहीतरी खावंसं वाटलं तर त्यातल्यात्यात कॅलरी कमी असलेले गोड पदार्थ खा.

sweet

– दिवसा भरपूर खाल्यावर रात्रीचा आहार जरा हलकाच असू द्या.

– दिवाळीतच थंडीचे दिवस सुरू होतात. गोड-धोड खाण्याला व्यायमाचाही जोड हवीच, त्यासाठी टाळाटाळ करू नका.

diwali

आपली प्रतिक्रिया द्या