किचनमध्ये उरलेले ‘हे’ पदार्थ पुन्हा गरम करून खाताय?आरोग्याच्या गंभीर समस्यांना देताय आमंत्रण; जाणून घ्या

आपल्याकडे जवळपास प्रत्येक घरात किचनमध्ये दुपारचे उरलेले अन्न, जेवण रात्री पुन्हा गरम करून खाल्ले जाते. मात्र खूप कमी लोकांना हे माहीत असेल की किचनमध्ये उरलेल्या काही गोष्टी पुन्हा गरम करून खाणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे त्या पुन्हा गरम करून खाण्याऐवजी थंड खाणेच योग्य. पाहुयात कोणत्या आहेत या गोष्टी…

1. चिकन (Chicken)

images-4
चिकन पुन्हा गरम करून खाणे योग्य नाही. एकदा शिजवलेले चिकन पुन्हा गरम केल्याने यातील प्रोटीनचे कॉम्पोजिशन बदलते आणि यामुळे पचनाच्या समस्या निर्माण होऊ शकतात.

2. पालक (Spinach)

images-5
पालक पुन्हा गरम करून खाल्ल्याने कर्करोगासारखा आजार जडू शकतो. यामुळे कर्करोग होण्याचा धोका बळावतो. पालकात असणाऱ्या नाइट्रेटमध्ये पुन्हा गरम केल्याने असे काही बदल होतात ज्यामुळे कर्करोगाचा धोका वाढतो.

3. मशरूम (Mushroom)

images-7
मशरूम नेहमी ताजे खाण्याचा प्रयत्न असावा. मशरूम प्रोटिनची खाण आहे, मात्र पुन्हा गरम करून खाल्ल्याने यातील प्रोटिनचे कॉम्पोजिशन बदलते आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होतात.

4. बटाटा (Potato)

images-6
जवळपास प्रत्येक भाजीत मिक्स होणारा बटाटा आरोग्यासाठी उपयुक्त आहे. मात्र बटाटा भाजी करून बराच काळ याचे सेवन न केल्यास यातील पोषणमूल्य नष्ट होतात. तसेच पुन्हा गरम करून खाल्ल्यास पचनक्रियेवर नकारात्मक परिणाम होतो.

5. अंडे (Egg)

images-8
अंडे पुन्हा गरम करून खाणे नेहमीच हानिकारक आहे. अंड्यात असणारे प्रोटीन पुन्हा गरम केल्याने विषयुक्त होण्याच्या शक्यता वाढतात.

आपली प्रतिक्रिया द्या