प्राणायम

> दीर्घ श्वास घेतल्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि चरबी वेगाने कमी कमी होते. यामुळे वजन कमी होते.

> ताणतणावापासून दूर राहायचे असेल तर प्राणायाम किंवा दीर्घ श्वासाने फायदा होतो. यामुळे मेंदूला भरपूर ऑक्सिजन मिळाल्याने तो शांत राहातो.

> नियमित प्राणायाम केल्याने मेंदूमध्ये कार्टिसॉल नावाचे हॉर्मोन्स कमी बनतात. त्यामुळे ताणतणाव दूर व्हायला मदत होते.

> दीर्घ श्वास नियमित घेतल्याने शरीराला जास्त ऑक्सिजन मिळतो. त्यामुळे मेंदू आरोग्यदायी राहातो. यामुळे अनेक आजारांपासून बचाव होतो.

> फुफ्फुसे शरीरातील विषाक्त पदार्थ बाहेर टाकण्याचे काम करतात. दीर्घ श्वासामुळे ही प्रक्रिया वेगाने होऊ शकते.

> हृदय मजबूत तर शरीर फिट… दीर्घ श्वासामुळे हृदयाला जास्त ऑक्सिजन मिळतो. यामुळे ते आरोग्यदायी राहाते. अर्थातच यामुळे हृदयाशी संबंधित कोणतेही रोग होत नाहीत.

> दीर्घ श्वासाचा आणखी एक फायदा म्हणजे फुफ्फुसांमधील ब्लॉकेज मोकळे होतात. यामुळे दम लागणे, श्वास लागणे असे प्रकार होत नाहीत.