टीप्स – सोन्याची आंबेहळद

एका वाटीत हळद, चंदन याची पेस्ट करून त्यात २ ते ३ चमचे दूध टाका. हे मिश्रण चेहऱ्यावर लावून दोन ते तीन मिनिट चेहऱ्यावर मसाज करा. दहा मिनिटांनंतर चेहरा कोमट पाण्याने धुऊन टाका.

> उन्हामुळे चेहरा काळवंडला असेल तर त्यासाठी हळद आणि दही क्रब फार गुणकारी असतो. त्यासाठी दीड चमचा हळद व एक चमचा दही एकत्र मिक्स करा. ही पेस्ट चेहऱ्यावर पंधरा मिनिटे लावून ठेवा आणि नंतर कोमट पाण्याने चेहरा धुऊन टाका. चेहरा तजेलदार होतो. हळद त्वचा स्वच्छ करून दह्यामुळे त्वचेला ओलावा मिळतो.

> शरीरावर गाठ आली असेल तर त्या गाठीवर आंबेहळदीच्या लेप लावावा. आराम मिळतो. ती गाठ बसण्यास मदतच होईल.

चिमूटभर आंबेहळद दुधाच्या सायीमध्ये एकत्र करून चेहऱ्यावर लावल्यास चेहऱ्याचा रंग उजळण्यास मदत होते.

> हळदीमध्ये जंतुनाशक घटक असतात. त्यात रक्त शुद्ध करण्याचे गुणधर्म असल्याने चेहरा तजेलदार ठेवण्यास त्याची मदत होते. चेहऱ्यावर बरेच डाग असतील तर अशावेळी हळदीचा पॅक तयार करून चेहऱ्यावर लावावा. हळदीत आढळणारे ऍण्टिसेप्टिक गुण डाग मिटवण्यात मदत करतात.

> चेहऱ्यावर डाग, सुरकुत्या असल्यास हळद आणि मधाच्या मिश्रणात २ ते ३ थेंब गुलाबजल टाका. ते मिश्रण चेहरा आणि मानेला लावा. असे आठवडय़ातून दोन ते तीन वेळा करा.

> कोणत्याही कारणाने दुखापत होऊन रक्त साकळले असल्यास त्यावर आंबेहळद उगाळून कोमट करून लावावी. याने सूज कमी होते त्याचप्रमाणे वेदना कमी होण्यास मदत होते.