Tips – पायांना भेगा पडतात? अशी घ्या काळजी…

हिवाळ्यात अनेकांच्या पायाला भेगा पडतात. बऱ्याचदा या भेगांमुळे आग किंवा जळजळ होते. पायांच्या भेगा वेदनादायी असल्याने यावर वेळीच उपचार करावा, अन्यथा भविष्यात या भेगा आणखी त्रास देण्याची शक्यता असते.

का पडतात या भेगा?

उष्म्यामुळे किंवा थंडीमुळे, सततचा प्रवास, मातीतील काम किंवा चांगल्या कंपनीच्या व योग्य आकाराच्या, दर्जाच्या चपला, बूट न घातल्याने देखील पायांना भेगा पडतात. तसेच व्यवस्थित निगा राखली नाही तर पायांना भेगा पडतात. तसेच उतारवयात देखील हा त्रास वाढतो.

अशी घ्या काळजी…

– आपले पाय कायम स्वच्छ ठेवावे

– अंघोळीदरम्यान किंवा बाहेरून आल्यावर पाय कोमट पाण्याने धुवावे.

– पायाच्या टाचांना भेगा पडल्या असतील तर रात्री झोपताना ग्लिसरिन लावून पायमोजे घालून ठेवावेत. सकाळी गार पाण्याने पाय धुवावेत.

– अंघोळीच्या आधी कोमट पाण्यात व्हिनेगर घालून त्या पाण्यात पाय बुडवून ठेवावेत.

– मधाच्या पोळ्यातील ताजे मेण काढून, वितळवून त्यात थोडी बोरीक पावडर मिसळून टाचांच्या भेगांवर लावल्यास भेगा बंद होतात.

– अंघोळी नंतर मोहरीच्या तेलामध्ये थोडी हळद घालून भेगांवर लावणेही फायदेशीर ठरते.

आपली प्रतिक्रिया द्या