Tips – घरच्या घरी असा बनवा आयुर्वेदिक काढा अन रोग प्रतिकारशक्ती वाढवा

कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असून रुग्णांमध्येही वाढ होत आहे. अशा या रोगट वातावरणात प्रतिकारशक्ती (Immune System) मजबूत असणे आवश्यक आहे. कमजोर  पडलेली प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी अनेक घरगुती उपाय आवश्यक असतात. आज आपण अशाच प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या काढ्याबाबत माहिती घेणार आहोत.

हा आयुर्वेदिक आणि आरोग्यासाठी लाभदायक असणारा काढा (1 कप)  बनवण्यासाठी आपल्याला 2 ते 3 वेलची (वेलदोडा, हिरवा किंवा काळा), एक बुटुक कच्ची हळद, 3 ते 4 लवंग, 3 ते 4 काळे मिरे, दालचिनी, 1 छोटं बुटुक आलं (अद्रक), गवती चहा, तुळशीची 10 ते 12 पानं, गूळ किंवा मध यांची आवश्यकता आहे.

असा बनवा झटपट काढा

– काढा बनवण्यासाठी हळद आणि आलं चांगलं कुटून घ्या

– गॅसवर पाणी उकळण्यासाठी ठेवा.

– उकळलेल्या पाण्यात वेलदोडा (हिरवा किंवा काळा), कच्ची हळद, लवंग, काळे मिरे, दालचिनी, आलं (अद्रक), मनुके आणि तुळस असे सर्व मसाले टाका आणि 20 ते 30 मिनिटं चांगले उकळू द्या.

– जवळपास अर्ध्या तासानंतर काढ्याचा रंग विटकरी झाला की यात गूळ किंवा मध टाका आणि सेवन करा.

– विशेष म्हणजे आजारी आणि आजारी नसलेले व्यक्ती देखील याचे सेवन करू शकतात. यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते. तसेच कफ आणि घसा खराब असल्यास त्यावरही हा काढा लाभदायक आहे.

Health – ‘या’ पाच गोष्टींचे सेवन केल्याने प्रतिकारशक्ती होते क्षीण, झोपण्यापूर्वीची ‘ही’ सवय सर्वात घातक

आपली प्रतिक्रिया द्या