Health – ‘या’ पाच गोष्टींचे सेवन केल्याने प्रतिकारशक्ती होते क्षीण, झोपण्यापूर्वीची ‘ही’ सवय सर्वात घातक

कोरोना विषाणूच्या अनुषंगाने सध्या जगभरात प्रतिकारशक्ती (Immunity power) कशी वाढवावी, काय सेवन करावे, काय करू नये याबत उहापोह केला जात आहे. प्रतिकारशक्ती कमी असल्यास कोणताही रोग तुमच्यावर हल्लाबोल करू शकतो. त्यामुळे हा विषय ऐरणीवर आला आहे. आजपर्यंत अनेक आहारतज्ज्ञांनी प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी कोणत्या भाज्या, फळे, शाकाहार, मांसाहार सेवन करावे याबाबत यथोचित माहिती दिली आहे. मात्र आज आम्ही कोणत्या गोष्टींचे सेवन केल्याने प्रतिकारशक्ती कमी होते याबाबत माहिती देणार आहोत.

प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी डायट महत्वाचा असतो. मात्र काही वाईट सवयीमुळे प्रतिकारशक्ती क्षीण होते. यामुळे आपण अजाणतेपणी गंभीर आजारांना आमंत्रण देत असतो. पाहूया कोणत्या आहेत या 5 गोष्टी…

1. दारू आणि धूम्रपान
कोणत्याही प्रकारची नशा शरीराला आतून पोखरत जाते. यामुळे तुमची प्रतिकारशक्ती कमी होत जाते. त्यामुळे दारू आणि धूम्रपान यापासून लांब राहायला हवे. धूम्रपान केल्याने फुफ्फुसांवर वाईट प्रभाव पडतो, तर दारूमुळे लहान-मोठे आतडे, किडनी यावर गंभीर परिणाम होतात.

2. झोपण्यापूर्वीच्या सवयी
अनेक लोकांना झोपण्यापूर्वी चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असते. मात्र हे शरीरासाठी घातक असून याचा प्रभाव तुमच्या प्रतिकारशक्तीवर होतो. कॅफिनचे सेवन झोपण्यापूर्वी करणे अपायकारक आहे. याचा थेट संबंध झोपेशी असतो. यामुळे झोप उडू शकते आणि कमी झोपेमुळे प्रतिकारशक्ती क्षीण होते.

3. प्रक्रिया केले खाद्य
प्रक्रिया केलेले खाद्य यामुळे शरीरावर वाईट परिणाम होतात. कारण बहुतांश प्रक्रिया केलेले खाद्य (Proceced food) यामध्ये साखर, मीठ, रिफाइन्ड कार्ब्स आणि प्रिजर्वेटिव्स असतात आणि यामुळे प्रतिकारशक्ती कमी होते.

4. रिफाइन्ड फूड्स
जास्त प्रमाणात रिफाइन्ड फूड्सचे सेवन केल्याने प्रतिकारशक्ती कमी होते. रिफाइन्ड फूड्समुले सूक्ष्मजीव आणि महत्वपूर्ण कोलेजन बॅक्टेरिया यात असंतुलन निर्माण करते. यात प्रामुख्याने मैदा, पांढरा ब्रेड, साखर याचा जास्त वापर होतो. या गोष्टी शरीराला अपायकारक आहे.

5. फास्ट फूड
सध्याच्या जीवनशैलीत अनेक लोक फास्ट फूडचे अति प्रमाणात सेवन करतात. पिज्जा, बर्गर हे तर आजकाल कॉमन झाले आहे. मात्र यामुळे तुमची प्रतिकारशक्ती कमी होते. यात जीवनसत्त्वे आणि प्रथिने यांचे प्रमाण अत्यल्प असते.

आपली प्रतिक्रिया द्या