घरातले उपाय

44
लिंबाचा रस - कापसाच्या मदतीने डोळ्याखाली लिंबाचा रस लावून दहा मिनिटे तसाच राहू द्या आणि नंतर साध्या पाण्याने धुऊन घ्या. हा उपाय दिवसातून दोनवेळा करू शकता. सकाळी आणि रात्री करू शकता.

लिंबाचा रस चांगला ब्लिचिंग एजंट असतो. त्यामुळे चेहरा चमकदार होतो. लिंबामधील एसकॉर्बिक ऑसिड किंवा त्यातील व्हिटॅमिन-सी त्वचेवरील डाग दूर करून चेहरा तजेलदार करतो. एका वाटीत अर्ध्या लिंबाचा रस घ्यायचा. त्यात कापसाचा बोळा भिजवून डागांवर लावायचा. किमान तासभर रस सुकू द्यायचा. त्यानंतर साध्या पाण्याने धुवून टाकायचे. (लक्षात ठेवा लिंबाचा रस लावल्यानंतर उन्हात जाऊ नका.)

लिंबाप्रमाणेच संत्र्यामध्येही ब्लिचिंगचे गुणधर्म असतात. काळ्या डागांवर म्हणूनच संत्र्याचा रस फारच उपयोगी ठरतो. एका वाटीत दोन मोठे चमचे संत्र्याचा रस घेऊन त्यात चिमुटभर हळद घालायची. हे मिश्रण चांगले एकत्र करून ती पेस्ट रात्री झोपताना चेहऱयावर लावायची. सकाळी उठल्यावर कोमट पाण्याने चेहरा धुवून घ्यायचा.

आपली प्रतिक्रिया द्या