Health – जास्त दूध पिणेही अपायकारक, होऊ शकतात या समस्या

दूध- दुधामध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असते. दुधामधील प्रथिने उच्च दर्जाची असल्यामुळे शरीराची वाढीचं नियमन होतं, तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

प्रोटीन, कॅल्शियम, व्हिटॅमिन यांचा स्रोत असणारे दूध अबाल वृद्धांपासून सर्वच पितात. सुदृढ शरीरासाठी रोज दुधाचे सेवन करणे आवश्यक. यामुळे रोग प्रतिकारक्षमता वाढतेच शिवाय हाडेही मजबूत होतात. मात्र दुधाचे सेवन योग्य प्रमाणात केल्यास फायदा मिळतो, जास्त दूध पिणे शरीराला हानिकारक असते. यामुळे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. जाणून घेऊया…

पचनक्रिया बिघडते
दुधाच्या अति सेवनामुळे पचनाच्या समस्या निर्माण होतात. जास्त दूध प्यायल्याने पोट जड होते आणि गॅसची समस्या होते. त्यामुळे दुधाचे सेवन योग्य प्रमाणात करणे कधीही योग्य.

थकवा आणि सुस्ती येणे
जास्त दूध प्यायल्याने चलबिचल होणे, थकवा जाणवणे आणि सुस्ती येणे या समस्या होऊ शकतात. तसेच यामुळे आतड्याला सूज येऊन शरीराला नुकसान होऊ शकते.

त्वचेच्या समस्या
जास्त दूध सेवन केल्याने त्वचेच्या समस्या निर्माण होऊ शकते. तसेच यामुळे ऍलर्जी होऊ शकते. काहींना यामुळे तोंडात पांढरे चट्टे येण्याची समस्याही होऊ शकते.

ह्रदया संबंधी समस्या
दिवसभरात 3 ग्लास पेक्षा जास्त दुधाचे सेवन केल्यास हृदयाच्या गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो. अनेक संशोधनात हे समोर आले आहे. त्यामुळे दुधाचे किती सेवन शरीराला लाभदायक आहे हे जाणून घेण्यासाठी आहारतज्ज्ञ किंवा आपल्या फॅमिली डॉक्टरचा सल्ला घ्या.

आपली प्रतिक्रिया द्या