आरोग्यदायी टीप्य-ओवा खा!

सामना ऑनलाईन,मुंबई

घरात तयार होणाऱया मसाल्यामध्ये ओवा वापरला जातो. उचकी, ढेकर, कफ, पोटात वायू धरणे, छातीचे दुखणे, कीटकांवरील रोगांवर औषध म्हणून ओव्याचा वापर करणे फायदेशीर आहे. ओव्याचे बीज, तेल, फूल आणि सालींचा उपयोग आजारात औषध म्हणून करतात. ओव्याच्या बीजात अँण्टीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असते. गर्भवती महिलांसाठी ओव्याच्या बीजातील हा गुणधर्म खूपच फायदेशीर आहे. अशा महिलांना हाडांची कमजोरी, शारीरिक दुबळेपणा असे विकार असल्यास ओव्याचे बीज घ्यावे. हे बीज गरोदर महिलांच्या शरीराला आतून मजबूत बनवते.

मुखदुर्गंधीवर रामबाण उपाय

ओव्यात असणारा थिमोल हा घटक मुखशुद्धीकारक म्हणून काम करतो. मुखशुद्धीच्या समस्येवर ओव्याचे बीज चावून खावे. बडीशेप आणि ओवा सम प्रमाणात खाल्ल्यासही मुखदुर्गंधीची समस्या दूर होते.

ओव्याचे औषधी उपयोग

पोट बिघडल्यावर ओवा चावून खा. नंतर गरम पाणी प्या.

जंत झाले तर काळ्या मिठासोबत अर्धा चमचा ओवा खा.

३ ग्रॅम ओवा, थोडे मीठ खाल्ल्याने हृदयरोग दूर होतो.

दारू सोडवण्यासाठी दर दोन तासांनी ओsवा खावा.

ओव्याची पूड करून ती खोबरेल तेलात टाकून कपाळावर लावल्याने डोकेदुखी थांबते.

ओव्याच्या रसामध्ये दोन चिमूट काळे मीठ मिसळून सेवन करावे. नंतर गरम पाणी प्यावे. खोकला बरा होईल.

कोरडय़ा खोकल्यावरही ओवा खा.

कान ठणकत असल्यास कानात १ थेंब ओव्याचे तेल टाकल्यास कानाचे दुखणे बरे होते.  

आपली प्रतिक्रिया द्या