Health Tips – लैंगिक क्षमतेवर होतो वाईट परिणाम, ‘या’ सवयी आत्ताच सोडा

34026
प्रातिनिधिक फोटो

आजच्या धकाधकीच्या जीवनात अनेक वाईट सवयी आपल्या अंगवळणी पडल्या आहेत. जंक फूड खाणे, कोल्ड्रिंक पिणे, मोबाईलचा अति वापर या सवयी वाढत चालल्या आहेत. आजची तरुणाई या विळख्यात अडकतात दिसत असून याचा थेट परिणाम शरीरावर होत असतो. तसेच काही चुकीच्या सवयींमुळे वैवाहिक जीवन, सेक्स लाईफ बिघडू शकते. त्यामुळे आत्ताच या सवयी ओळखून त्यात लवकरात लवकर सुधार केला पाहिजे.

चला तर कोणत्या आहेत या सवयी पाहूया…

1. जंक फूड खाणे आरोग्यासाठी हानिकारक असल्याचे तुम्ही ऐकले असेल पण यामुळे लैंगिक क्षमतेवरही वाईट परिणाम होतात. जंक फूडमध्ये मोठ्या प्रमाणात मिठाचा, साखरेचा आणि रिफाईंडचा वापर केलेला असतो. या गोष्टीमुळे चरबी वाढून तुम्ही जाड होता आणि त्यामुळे आळशीही होता. तसेच यामुळे ब्लड शुगरची लेव्हल खाली येते व याचा प्रभाव लैंगिक क्षमतेवर होतो.

junk-food

2. आजकाल हॉटेलमधून पदार्थ मागवून खाण्याचे प्रमाण वाढत आहे. बाहेरील पदार्थात (जंक फूड इ.) मिठाचा वापर वारेमाप केला जातो. जास्त मीठ खाल्ल्याने हाय ब्लड प्रेशरचा त्रास वाढतो आणि यामुळे यामुळे कामेच्छा संपते.

salt

3. कोणत्याही स्थितीत तणाव ठीक नाही. यामुळे हृदयावर परिणाम तर होतोच याशिवाय तणावामुळे एस्ट्रोजन हार्मोन प्रभावित होतात. त्यामुळे सेक्स करण्याची इच्छा मरते. त्यामुळे ताण-तणावापासून जितके दूर राहता येईल तितके रहा.

hypertension

4. दारू पिणे आणि सिगारेट ओढणे ही तर आजच्या कॉर्पोरेट जगतातील नित्याची गोष्ट झाली आहे. मात्र जास्त दारू प्यायल्याने सेक्स सेन्स लवकरच शिथिल होतो, तसेच स्मोकिंग आणि ड्रग्ज याचा थेट प्रभाव सेक्स ऑर्गन्सवर होतो.

drugs

5. एका संशोधनात मोबाईल सतत खिशात ठेवल्याने त्यातून निघणाऱ्या रेडिएशनमुळे लैंगिक क्षमता आणि शुक्राणूंची संख्या यावर परिणाम होत असल्याचे समोर आले. तसेच सतत पॉर्न पाहिल्याने सेक्स मधील इंटरेस्ट कमी होत असल्याचे समोर आले आहे.

mobile

आपली प्रतिक्रिया द्या