का बरं स्ट्रेचरवरून पळाला असेल हा रुग्ण? व्हायरल व्हिडीओमुळे पडलेल्या प्रश्नाची नेटकऱ्यांनी दिली भन्नाट उत्तरं

सध्या आरोग्यसेवेचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अनेकांना तो खर्च पेलवत नाही. रुग्णालयातून बरे झालेले अनेकजण बिलाचा आकडा बघितल्यानंतर तणावामुळे पुन्हा आजारी पडतात. एका व्यक्तीला उपचारासाठी अॅम्बुलसमधून रुग्णालयात नेण्यात येत होते. त्यावेळी त्या व्यक्तीने स्टेचरवरून उठत धूम ठोकली. तो स्टेचरवरून का पळाला, याची माहिती मिळालेली नाही. मात्र, या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होताच, रुग्णालयातील बिलाला घाबरूनच त्याने पळ काढला असावा, अशी चर्चा सोशल मिडीयावर रंगली आहे.

तो रुग्ण स्टेचरवरून का पळाला, याची नेमकी माहिती मिळत नसल्याने सोशल मिडीयावर याबाबतच्या तर्कवितर्कांना उधाण आले आहे. त्यावर अनेकांनी मजेशीर प्रतिक्रियाही दिल्या आहेत. त्याने बिलाला घाबरून धूम ठोकली असेल तर त्याचे कौतुक करायला हवे, रुग्णालयातील अव्वाचीसव्वा बिले पाहून ताणतणाव सहन करण्यापेक्षा घरीच राहून उपचार घेतलेले बरे, असे काहीजणांनी म्हटले आहे.

हा व्हिडीओ अमेरिकेतील असून आतापर्यंत 80 लाखांपेक्षा जास्तवेळा तो बघण्यात आला आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अमेरिकेसह जगभरात वाढत असलेल्या आरोग्यसेवेच्या खर्चाबाबत चर्चा सुरू झाली आहे. खाकी रंगाची शॉर्टस् आणि सफेद टी शर्ट घातलेल्या रुग्णाला स्टेचरवरून अॅम्बुलसमध्ये ठेवण्यात येत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्याचवेळी तो रुग्ण स्चेचरवरून उठतो आणि रस्तावरच मिळेत त्या दिशेने धूम ठोकतो, असे व्हिडीओत दिसत आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात येत असल्याची माहिती मिळाली आहे.

रुग्ण त्यावेळी नशेत होता. त्याला वैद्यकीय मदत नको होती, त्याला बळजबरीने उचारासाठी रुग्णालयात नेण्यात येत होते. त्यामुळेच त्याने पळ काढल्याची शक्यताही अनेकांनी वर्तवली आहे. या व्हिडीओतून तो रुग्ण नशेच्या आहारी असल्याचे दिसत असल्याचे मतही अनेकांनी वर्तवले आहे. मात्र, रुग्णालयातील खर्चाला घाबरुन त्याने वैद्यकीय मदत नाकारली असेल, तर ते योग्यच असल्याचे अनेक नेटकऱ्यांनी म्हटले आहे. त्याने पळून जाण्याऐवजी आरोग्यसेवकांना सहकार्य करायला हवे होते. त्याच्या अशा वागण्याने त्याच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो, असे मतही काहींनी व्यक्त केले आहे.

अमेरिकेत अॅम्बुलन्सच्या एका फेरीसाठी 450 डॉलर( सुमारे 33,461 रुपये) मोजावे लागतात. तर एअर लिफ्टिंगसाठी 21 हजार डॉलर ( सुमारे 15,61,515 रुपेय) खर्च येतो. त्यानंतर रुग्णालयातील खर्चही महागडा असतो. मेडिक्लेम असल्यास तो मिळवण्यासाठीही अनेक खटपटी कराव्या लागतात. या घटनेनंतर आरोग्यसेवेवरील वाढता खर्च यावर चर्चा होत असून या व्हिडीओवर अनेक मजेशीर प्रतिक्रिया देण्यात येत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या