आरोग्यदायी खजुराच्या गुळाची मिठाई

180

गूळ आपल्या हिंदुस्थानी खाद्यसंस्कृतीतला एक महत्त्वाचा पदार्थ आहे. गूळ हिंदुस्थानातील अनेक प्रांतात तयार होतो आणि वेगवेगळ्या प्रकारचा असतो. उसापासून, पामच्या झाडापासून आणि खजुरापासून. खजुराच्या झाडापासून केलेला गूळ हा हिंदुस्थानात फक्त पश्चिम बंगालमध्ये तयार होतो. या गुळाचे उत्पादन फक्त हिवाळ्यात होते. या गुळाची ठरावीक चव असते आणि सुगंधही निराळा असतो. या गुळापासून अनेक खाद्यपदार्थ बनवले जातात आणि साखरेऐवजी खजुराच्या गुळाचा उपयोग केला जातो.

खजुराचा गूळ हा खजुराच्या झाडातून निघालेल्या चिकापासून बनवला जातो. खुजराच्या डाळाला एक चीर देऊन त्यातून गळणारा चीक एका मातीच्या भांड्यात साठवला जातो. या भांड्यात चीक जमा झाला की तो चीक एका लोखंडाच्या कढईत आटवून मग घट्ट होताच त्या आटवलेल्या चिकाला थंड केले जाते. तो थंड झाला की ढेपा केल्या जातात.

हा गूळ थंडीतच केला जातो. उन्हाळ्यात हा गूळ आंबत असल्यामुळे त्याची चव शिळी लागते. हा गूळ सेंद्रिय असतो आणि त्याच्या उत्पादनात कोणतीही रासायनिक क्रिया केली जात नाही.
सध्या खजुराच्या गुळाचे उत्पादन घरगुती स्तरावर होत असल्यामुळे ते कमी होत आहे. झाडे बांधकामासाठी पाडल्यामुळे गुळाच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे.

date_palm

पश्चिम बंगालमध्ये या गुळाचा उपयोग अनेक गोड पदार्थ करायला साखरेच्या ऐवजी केला जातो. हा गूळ आरोग्याला गुणकारी असतो आणि त्याचा नियमित वापर केल्याने अनेक फायदे होतात.

 • गूळ उष्ण असतो. म्हणूनच त्याचा वापर हिवाळ्यात आहारात केला जातो.
 • गूळ खाल्ल्याने शरीरात ऊर्जा निर्माण होते. थंडीमुळे झालेल्या सर्दी आणि खोकल्यावर गूळ उपयुक्त ठरतो.
 • खजुराच्या गुळात लोह असल्यामुळे हा गूळ खाल्ल्याने हिमोग्लोबिन वाढते आणि शरीराला अनेमियापासून संरक्षण देते.
 • गूळ खाल्ल्याने पचनक्रिया सुरळीत राहते आणि शरीराला सशक्त ठेवते.
 • हा गूळ खाल्ल्याने शरीरातील विषाणू बाहेर टाकण्यात मदत होते. शरीर कायम उत्साहजनक राहते.
 • खजुराच्या गुळात खनिजांचा साठा असल्यामुळे आरोग्याला गुणकारी असतो.
 • गुळात कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियमसारखी खनिजे असतात.
 • अनेक जीवनसत्वे आणि कर्बोदके असल्यामुळे शरीराला उत्साहपूर्ण ठेवते.
 • या गुळामुळे पचनक्रिया सुरळीत झाल्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यास मदत होते.
 • अर्धशिशीपासून होणाऱया डोकेदुखीवर एक चमचा गूळ खाल्ल्याने दुखण्यापासून आराम मिळतो.
 • हा गूळ खाल्ल्याने रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते. शरीरात पाणी धारणा होण्यापासून संरक्षण मिळते.
 • खजुराच्या गुळाचा नियमित आहारात समावेश केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मदत होते.

पाककृती

तांदूळ आणि खजुराच्या गुळाची खीर
साहित्यः तांदूळ, तूप, खजुराचा गूळ, दूध, दालचिनी, तमालपत्र, वेलची पूड.
कृतीः तूप कढईत तापत ठेवावे. भिजवलेले तांदूळ थोडे परतवून घ्यावे आणि ते दूध घालून शिजवायचे. तांदूळ शिजल्यानंतर त्यात गूळ घालावा आणि वेलची पूड घालावी. ही खीर मातीच्या भांडय़ात ठेवावी. यामुळे खीर दाट होते

आपली प्रतिक्रिया द्या