व्यायामासोबत हे खा! तब्येत बनवा

5

सामना ऑनलाईन । मुंबई

सदृढ शरीर हीच खरी संपत्ती असते, असं म्हटलं जातं. मग त्या शरीराची काळजी घेणे ही आपली जबाबदारी असते. त्यासाठी व्यायाम करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मात्र व्यायामासोबतच परिपूर्ण असा आहार घेणेही तितकंच गरजेचं आहे.

व्यायामासोबत आहारात कोणत्या गोष्टीचा समावेश कराल?

सुका मेवा
जिमला जाऊन व्यायाम केल्यानंतर सुका मेवा खाल्यास शरीराला ताकद मिळते. सुक्या मेव्यात काजू, बदाम, पिस्ता तसेच मनुके खाल्ल्याने शरीराला आजारांपासूनही दूर ठेवते.

अंड
अंड्यांमध्ये मोठया प्रमाणात प्रोटीन असते. ज्यामुळे ताकद आणि स्टॅमिना वाढण्यासाठी मदत होते. अंड तुम्ही कशाही प्रकारे खाऊ शकता. अंड्यामुळे रक्तात गुड कोलेस्ट्रॉल म्हणजेच एचडीएलचं प्रमाणही वाढतं

केळी
केळामध्ये पोटॅशिअम तसेच वेगळेगळ्या प्रकारचे व्हिटॅमिन्स असतात जे तुमच्या स्नायूंना मजबूत करतात

रताळे
रताळ्यामुळे शरीराला मोठ्या प्रमाणात उर्जा मिळते. यामध्ये कार्बोहायड्रेड असतं. त्यामुळे व्यायामाच्या अगोदर रताळं खाणं चांगलं असतं.

ओट्स
ओट्समध्ये व्हिटॅमिन–बी भरपूर प्रमाणात असतात. व्हिटॅमिन-बी मुळे शरीराचा तणाव कमी होण्यास मदत होते. व्यायामानंतर ओट्सचं सेवन केल्यास शरीराची ताकद वाढण्यास मदत होते. तसंच ओट्स पचायलाही हलकं असतं.

आपली प्रतिक्रिया द्या