आरोग्यदायी सुका मेवा

1805

दाम, पिस्ता, अक्रोड, सुके अंजीर, खारीक खाल्ल्याने हाडे बळकट होऊन कॅल्शियमची गरज भागवली जाते. सुकामेव्यामध्ये फॅटी ऑसिड, फायबर्स, जीवनसत्त्वं आणि मिनरल्स यांचा मुबलक साठा असतो. म्हणून सुकामेव्याच्या सेवनाने भुकेवर नियंत्रण राहते. महत्त्वाचे म्हणजे कॅलरीज झटपट वाढत नाहीत.

सुकामेव्यातील आरोग्यदायी फॅटस् आणि प्रोटिन्समुळे आरोग्य सुधारण्यास मदत होते. खजूर, बेदाणे, मनुका, पिस्ता, अक्रोड खाल्ल्याने शरीरातील हिमोग्लोबीनची वाढ होते. परिणामी रक्तही वाढते. सुकामेवा एकत्रित करून खावा. खारवलेले काजू-बदाम खाण्याऐवजी तो नैसर्गिक स्वरूपातच खावा. पिस्ता पचायला जड आहे, मात्र तो मलावरोध, अशक्तपणा, रक्तशुद्धि या विकारांवर गुणकारी आहे.

सुकामेव्यात प्रथिनांचे प्रमाण जास्त असल्याने शाकाहारी व्यक्तिंनी आहारात सुकामेव्याचा समावेश करावा.
जीवनसत्त्व ई, मॅग्नेशियम, झिंक, हाडांसाठी आवश्यक असणारे बोरोन, तसेच सेलेनियम सारखे अँण्टिऑक्सिडंट सुकामेव्यातून मिळते. यामध्ये असलेले स्निग्ध पदार्थ ह्रदयासाठी लाभदायी आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या