हिवाळ्यात ‘हे’ पदार्थ खाल तर आरोग्य संपन्न व्हाल !

सामना ऑनलाईन । मुंबई

हिवाळा सुरू झाला की, प्रत्येकाच्या घरात आरोग्याबाबत काळजी घेतली जाते. त्याचप्रमाणे थंडीचा बचाव करण्यासाठी उबदार कपडे घालण्यावर भर दिला जातो. पण कितीही उबदार कपडे घातले तरी शरीराच्या आत उष्णता असणे आवश्यक असते. त्यामुळे थंडीच्या दिवसात आहाराकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. तसंच या ऋतूत खाल्लेलं अन्न हे शरीराला लाभतं. त्यामुळे डाएट काही काळ विसरा आणि शरीराला आरोग्यसंपन्न बनवा.

थंडीतील सर्वसाधारण आहार –

१. थंडीच्या दिवसात भूक जास्त लागते. त्यावेळी भूक मारू नका. योग्य आणि भरपूर आहार घ्या.

२. तीळ, शेंगदाणे, गूळ यासारखे शरीराला उष्णता देणारे पदार्थ या मोसमात आवर्जून खा.

३. दैनंदिन आहारात पालेभाज्यांचा समावेश करा.

४. आहारात बाजरीची भाकरी, तूप, दही यांचे सेवन करा.

५. या दिवसात सकाळी उठल्यावर पोहे, उपमा, यांसारखे पौष्टिक पदार्थाचा नाश्ता करा.

health-food

६. हिवाळ्यात मधाचा वापर आरोग्याला विशेष लाभदायक ठरतो.

७. मोहरीचे तेल, सोयाबीन, अक्रोड, जवस या पदार्थाचे सेवन करा.

८. या दिवसात मांसाहारी पदार्थाचे सेवन जास्त प्रमाणात करा.

९. हिवाळ्याच्या हंगामात मिळणारी फळ आवर्जून खा.

१०. मोड आलेल्या कडधान्यांचा आहारात समावेश करा.

आपली प्रतिक्रिया द्या