बाळंतपणानंतर पंजीरीचे सेवन लाभदायक, ‘या’ पद्धतीने बनवाल तर होईल अधिक फायदा

आई होणे प्रत्येक स्त्रीसाठी सुखाचा क्षण असतो. या काळात झालेल्या श्रमामुळे बाळंतीण बाईची काळजी घेण्यासाठी अवघे घर-दार उभे असते. बाळंतपणामध्ये स्त्रीच्या शरिराची झिज होते. रक्तस्त्राव झाल्यामुळे तिला थकवा देखील जाणवता. हा थकवा घालवण्यासाठी आणि शरीर पुन्हा टुणटुणीत होण्यासाठी जुनी-जाणती लोक अनेक पौष्टीक पदार्थ खाण्याचा सल्ला देतात. यातीलच एक म्हणजे पंजीरी.

बाळंतपणानंतर स्त्रीची काळजी घेणे जिकरीचे असते. कारण या काळात तिच्या शारिरीक आणि मानसिक आरोग्यावरही परिणाम झालेला असतो. भविष्यामध्ये तिच्या आणि बाळावर याचा परिणाम होऊ नये यासाठी आपल्याकडे बाळंतीण बाईला विविध पदार्थांसोबत पंजीरी देखील खायला दिली जाते. पंजीरीच्या सेवनामुळे बाळंतीण स्त्रीचा थकवा नाहीसा होतो. स्तनदा मातांनी याचे सेवन केल्याने बाळालाही लाभ होतो. ते सुदृढ व निरोगी राहते. चला तर याबाबत अधिक जाणून घेऊया…

आरोग्यदायी पंजीरी बनवण्याचे साहित्य

panjiri1

पंजीरी बनवण्यासाठी आपल्याला 150 ग्रॅम गाईचे किंवा म्हशीचे शुद्ध तूप, 50 ग्रॅम पांढऱ्या तिळाचे बी, 50 ग्रॅम भोपळ्याचे बी, 50 ग्रॅम आळीवाचे बी, 50 ग्रॅम जवसाचे बी, 50 ग्रॅम सूर्यफुलाचे बी, 200 ग्रॅम काजू (चांगल्या प्रतीचे), 200 ग्रॅम बदाम (चांगल्या प्रतीचे), 200 ग्रॅम अकरोड, 200 ग्रॅम कमळाचे बी (मखाना), 50 ग्रॅम खाण्याचा डिंक, 50 ग्रॅम धने, 20 ग्रॅम मनुके, 50 ग्रॅम पिस्ता, 1 कप रवा, 100 ग्रॅम किसलेले नारळ आणि 350 ग्रॅम बारीक केलेला गूळ या साहित्याची आवश्यकता आहे.

अशी करा तयारी

panjiri-2

– गॅस सुरू करून पॅन किंवा पातेल्यात पांढरे तिळ, भोपळ्याचे बी, आळीवाचे बी, जवसाचे बी आणि सूर्यफुलाचे बी मंच आचेवर भाजून घ्या.

– बी तडतड करू लागल्यावर थंड होण्यासाठी एका वेगळ्या भांड्यात काढून घ्या.

– पॅनमध्ये चार चमचे शूद्ध तूप टाका आणि गरम झाल्यावर हळू-हळू खाण्याचा डिंक त्यामध्ये घाला.

– डिंक चांगला तळून झाल्यावर थंड होण्यासाठी वेगळ्या भांड्यात काढून घ्या.

– वरीलप्रमाणे काजू, बदाम, अकरोड आणि कमळाचे बी वेगवेगळे भाजून घ्या.

– भाजलेले सर्व बी आणि सुकामेवा एका भांड्यात काढून घ्या, फक्त कमळाचे बी वेगळ्या भांड्यात ठेवा.

– त्यानंतर मनुके, पिस्ता आणि नारळाचा किस देखील शुद्ध तुपामध्ये भाजून घ्या.

– मनुके आणि पिस्ता एका भांड्यात, तर नारळाचा भाजलेला किस दुसऱ्या भांड्यात ठेवा.

– पुन्हा पॅन किंवा पातेल्यात 3 ते 4 चमचे शुद्ध तूप टाका. गरम झाल्यावर यात रवा टाका आणि गुलाबी रंगाचा होईपर्यंत भाजून घ्या. त्यानंतर रवा गार होण्यासाठी वेगळ्या भांड्यात काढून घ्या.

पंजीरी बनवण्याची कृती

panjiri3

– थोडे-थोडे करून मिक्सरच्या भांड्यात सुका मेवा टाका आणि एकदम बारीक न करता थोडा रवाळ राहू द्या. तसेच थोडा सुका मेवा पंजीरीला सजवण्यासाठी वेगळा ठेवा.

– सुका मेव्याप्रमाणे भाजलेले सर्व बी आणि धने मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.

– उरलेली सर्व सामग्री सुका मेवा आणि बी यांच्यामध्ये एकत्र करून घ्या.

– अशा पद्धतीने आपली आरोग्यदायी पंजीरी तयार झालेली असेल.

पंजीरीत वापरलेल्या साहित्याचे फायदे

panjiri-4

पंजीरीचे सेवन करणे बाळंतीण बाई आणि स्तनदा मातांसाठी खूप लाभदायक असते. पंजीरी बनवण्यासाठी वापरलेल्या वेगवेगळ्या साहित्याचे फायदे बघुया..

– भोपळ्याचे बी बाळंतपणानंतर बाळंतीण बाईला ताकद देतात आणि रक्तदाब देखील नियंत्रणामध्ये ठेवतात.

– अळीवच्या बिया या लोह खनिजाचा मोठा स्त्रोत असतात. बाळंतपणामध्ये बाळंतीण बाईचे रस्त मोठ्या प्रमाणात वाहते, त्यामुळे बाळंतपणानंतर बाळंतीण बाईने अळीवाचे सेवण करणे लाभदायक असते. यामुळे रक्ताची कमतरता दूर होते.

– पंजीरी बनवण्यासाठी वापरलेले पांढरे तिळ स्तनदा मातांमधील दूध वाढवण्यासाठी आणि हार्मोन्सचे संतुलन राखण्यास मदत करतात.

– बऱ्याचदा बाळंतपणानंतर बाळंतीण बाईचे वजन वाढते. हे वजन नियंत्रित ठेवण्याचे काम जवस करतात. तसेच स्तनदा मातांमधील दूध वाढवण्यासही जवस मदत करतात.

– सूर्यफुलाचे बी बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्याचे काम करतात. तसेच शरिरातील हार्मोन्सचे संतुलन राखण्यासाठीही सूर्यफुलाचे बी फायदेशीर आहे.

– धने कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण ठेवतात. तसेच त्वचेची सूज कमी होण्यासाठी आणि पचनाच्या समस्या कमी करण्यासाठी धने लाभदायक आहेत.

– पंजीरी बनवण्यासाठी वापरलेल्या शुद्ध तुपामध्ये व्हिटॅमिन ए, बी, ई आणि के मोठ्या प्रमाणात आढळते. यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होण्यास मदत होते.

– तसेच यात वापरलेला खाण्याचा डिंक हा बाळंतीण बाईसाठीच नाही तर स्तनपान करणाऱ्या मातांसाठीही लाभदायक आहे. डिंक हा अँटी-डिप्रेसेंट असतो आणि यामुळे मन शांत राखण्यास मदत होते. तसेच प्रतिकारशक्ती वाढवण्याचेही काम डिंक करतो.

– काजूचेही अनेक फायदे आहेत. डोळ्यांसाठी आणि केसांसाठी काजू फायदेशीर आहे. काजूचे सेवण केल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतो. तसेच काजू खाल्ल्यानंतर पोट रिकाम असल्याचे जाणवत नाही आणि यामुळे अति खाण्यापासूनही तुम्ही वाचू शकता.

– बदामाचे आवरण केसांसाठी उपयुक्त असते. वजन कमी करण्यासाठी बदाम लाभदायी मानले जातात. तसेच रक्तातील साखर नियंत्रणाचे कामही बदाम करतो

– अरकोड हाडांना मजबूत ठेवण्यासाठी मदत करतात. तसेच ह्रद्याचे आरोग्य राखण्यासाठी मदत करतात.

आपली प्रतिक्रिया द्या