सोनी बीबीसी अर्थवर ‘हेल्दी टेल्स’

सोनी बीबीसी अर्थ प्रेक्षकांना हिंदुस्थानातील वन्यजीवनाची सफर घडवण्यासाठी ‘इंडिया ऍट 9’ घेऊन येत आहे. पश्चिम हिमालयामध्ये वसलेल्या व्हॅली ऑफ फ्लॉवर्स आणि देशाच्या पूर्व किनारपट्टीवर अंडय़ातून बाहेर पडणाऱया कासवांच्या व्हर्च्युअल ट्रिपवर वाहिनी प्रेक्षकांना घेऊन जाणार आहे. तसेच सुपरफूडबाबतच्या गैरसमजांना दूर करत आरोग्य व अन्नावर लक्ष केंद्रित करणारा ‘हेल्दी टेल्स’ शो सादर करणार आहे.

हिंदुस्थानात अनेक नयनरम्य ठिकाणे आहेत, जी पर्यटकांना अचंबित करतात. ‘हिडन इंडिया’ प्रेक्षकांना हिंदुस्थानातील विस्मयकारक वन्यजीव, प्राचीन संस्कृती आणि नैसर्गिक सौंदर्याचे दर्शन घडवेल. ‘इंडियाज डेडलीएस्ट स्नेक्स’ सापांच्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी शिक्षित करण्यावर लक्ष केंद्रित करते. ‘द ट्रूथ अबाऊट कॅलरीज’ हा शो आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त आहाराचे सेवन करण्यास प्रेरित करतो, तर ‘शेफ व्हर्सेस सायन्स’मध्ये शास्त्रज्ञ मार्क मिओडोनिक हे जगातील सर्वात स्वादिष्ट पदार्थांमागील विज्ञान आणि स्वयंपाकघरात अन्नामध्ये होणारे आश्चर्यकारक परिवर्तन सादर करतील. ‘हेल्दी टेल्स’ रात्री 8 वाजता आणि  ‘इंडिया ऍट 9’ रात्री 9 वाजता सोनी बीबीसी अर्थवर प्रसारित होईल.