पपई खा

– पपईमध्ये क जीवनसत्त्व आणि फायबरचे प्रमाण जास्त असते. यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्टेरॉल साचून राहण्यापासून बचाव होतो. कोलेस्टेरॉल साचून राहिल्याने हृदयविकाराचा धोका संभवतो.

– एका मध्यम आकाराच्या पपईमध्ये १२० कॅलेरीज असतात. वजन घटवण्यासाठी पपईचा आहारात नियमित समावेश करावा. त्यामुळे वेळी-अवेळी भुकेवर नियंत्रण मिळवणे शक्य होते.

– आजारांशी सक्षमतेने सामना करण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचे कार्य पपई करते. शिवाय शरीरातील जीवनसत्त्व क गरजेपेक्षा जास्त पपईमुळे मिळू शकते.

– पपईमध्ये जीवनसत्त्व अ मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे डोळ्यांचे आरोग्य सुधारते. वाढत्या वयानुसार दृष्टी कमी होण्याची शक्यता असते. यापासून वाचण्यासाठी आहारात पपई हवाच.

-पपईमध्ये वेदनाशामक गुणधर्म असल्याने सांधेदुखीचा त्रास असलेल्यांनी पपई खावी. यामुळे साध्यांना मजबुती येऊन सूजही कमी व्हायला मदत होते.

– सध्याच्या व्यस्त जीवनशैलीमुळे बाहेरचे खाणे होते. याचा परिणाम पचनशक्तीवर होतो. अशावेळी पपई खाल्ल्याने त्यातील पपैन नावाचे एंजाईम पचन कार्य सुधरवते.

दिवसभराच्या धावपळीनंतर वाटीभर पपईचे काप खाल्ल्यास थकवा कमी होण्यास मदत होते. शिवाय शरीरातील हार्मेन्सचे प्रमाण संतुलित राखते.