नागपूरचे हृदय दिल्लीला रवाना

30

सामना प्रतिनिधी । नागपूर

आंतराज्यस्तरावर काल पहिल्यांदाच हृदय प्रत्यारोपण झाले. एका अपघातात ब्रेन डेड झालेले नागपूर रहिवासी अमित अवस्थी (४०) यांचे हृदय राजधानी दिल्ली येथे नेण्यात आले. अवस्थी कुटुंबीयांनी वेळीच अवयवदानाचा निर्णय घेतल्याने दोघांना जीवनदान तर दोघांना दृष्टी मिळाली.

हॉटेल व्यावसायिक अमित अवस्थी यांना उच्च रक्तदाबामुळे मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाला. त्यांना धंतोली येथील न्युरॉन हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. परंतु येथे उपचारानंतर डॉक्टरांनी अवस्थी यांना ब्रेनडेड घोषित केले. अवस्थी कुटुंबीयांवर दुखाःचा डोंगर कोसळला. या स्थितीतही अमित अवस्थी यांचे वडील विनोदकुमार अवस्थी, पत्नी रत्नावली अवस्थी व इतर कुटुंबीयांनी एकत्र येऊन अवयवदानाचा निर्णय घेतला.

विभागीय प्रत्यारोपण समितीचे सचिव डॉ. रवी वानखेडे यांनी अवयवदानासाठी पुढील प्रक्रियेला गती दिली. त्यानुसार २९ ऑक्टोबर रोजी शंकरनगर येथील वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये अमित अवस्थी यांना दाखल करण्यात आले. सोमवार ३० ऑक्टोबर रोजी सकाळी ८.३० वाजता अवयव काढण्याच्या शस्त्रक्रियेला सुरुवात झाली. वोक्हार्टचे सीव्हीटीएस सर्जन डॉ. समीर पाठक, नवी दिल्ली एम्सचे सीव्हीटीएस सर्जन डॉ. मिलिंद होटे, डॉ. अवंतिका जयस्वाल यांनी यशस्वीरीत्या हृदय काढले. वोक्हार्टचे ’मल्टी ऑर्गन ट्रान्सप्लांट सर्जन’ डॉ. अनुराग श्रीमल तर पुणे येथील यकृत प्रत्यारोपण सर्जन डॉ. नरुटे यांच्याकडे हृदय व यकृत सोपविण्यात आले. त्वचा डॉ. समीर जहागीरदार यांनी रोटरी स्किन बँकेत पाठवली तर नेत्रपटल (कॉर्निआ) माधवनगर नेत्रपेढीला देण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या