येत्या शनिवार रविवार दहिहंडीचा सराव अंतिम टप्प्यात असताना मुसळधार पाऊस मात्र त्यावर पाणी फिरवणार असे दिसतेय. येत्या शनिवार रविवारी हवामान खात्याने मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबईसह ठाणे, पालघर, रायगडला देखील मुसळधार पाऊस पडणार आहे. ठाणे व रायगडला शनिवारी ऑऱेंज अलर्ट देण्यात आला आहे.
येत्या सोमवारी 26 ऑगस्टला गोकुळअष्टमी आहे तर मंगळवारी दहिकाला उत्सव साजरा केला जाणार आहे. त्यामुळे जास्तित जास्त थर लावण्यासाठी सध्या गोविंदांचा जोरशोरमध्ये सराव सुरू आहे. त्यामुळे सध्या तरुणाईमध्ये मोठा उत्साह आहे. त्यात गणेशोत्सव देखील तोंडावर आला आहे. त्यामुळे सध्या शनिवार रविवारी बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसत आहे. त्यामुळे जर पावासाने हे दोन्ही दिवस गाजवले तर चाकरमान्यांना शॉपिंगचे प्लानही पुढे ढकलावे लागणार आहेत.