अतिवृष्टीतील बाधितांचे पंचनामे पूर्ण, प्रति कुटुंब 5 हजार रुपये सानुग्रह अनुदान

जिल्ह्यामध्ये 22 व 23 जुलै 2021 रोजी पुरपरिस्थिती निर्माण झाली होती. या पुरपरिस्थितीमुळे बाधित झालेल्या व्यक्तींच्या मालमत्तेचे पंचनामे करण्याचे काम १०० टक्के पूर्ण झाले आहे. या आपत्तीत मृत पावलेल्या व्यक्तींच्या वारसाना मदत सुरु करण्यात आली असून यामध्ये जखमी झालेल्या व्यक्तींनाही मदत देण्याची कार्यवाही सुरु झाली आहे.

ज्या नागरिकांचे भांडी, कुंडी व कपडयांचे नुकसान झाले आहे. त्यांना प्रती कुटुंब 5 हजार रुपये प्रमाणे सानुग्रह अनुदान वितरीत करण्याचे निर्देश देण्यात आले असून त्याप्रमाणे कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. सद्यस्थितीत जिल्हयामध्ये 57 ठिकाणी 1712 लोक सुरक्षित ठिकाणी आश्रयास राहत आहेत. त्याठिकाणी त्यांची निवास, भोजन, पिण्याचे पाणी व आरोग्य विषयक सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्यांना 01 ऑगस्ट 2021 अखेर पर्यंत 86 गावातील एकूण 1626 कुटूंबांना 162.60 क्विंटल गहु व 162.60 क्विंटल तांदूळाचे वाटप करण्यात आले आहे. तसेच एकूण 37 गावातील 304 कुटूंबांना 1520 लिटर केरोसिनचे वाटप करण्यात आले आहे. अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या 01 ऑगस्ट 2021 अखेर एकूण 25 हजार 665 लोकांना शिवभोजन थाळीचे वाटप करण्यात आले आहे. आत्तापर्यंत राज्यातील एकूण 104 सामाजिक संस्था व 21 व्यक्तींनी पूरग्रस्त भागासाठी प्रशासनामार्फत मदत केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या