आसाममध्ये पावसाचा कहर, लाखो नागरिक विस्थापित

50

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

उत्तर हिंदुस्थानमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. तर आसाममध्ये पावासाने थैमान घातले असून लाखो लोक विस्थापित झाले आहे. आसाममधील 17 जिल्हे पूरग्रस्त झाले असून 4 लाख 23 हजार नागरिक विस्थापित झाले आहेत.


ब्रह्मपुत्रा नदीची पातळी वाढल्याने 17 जिल्ह्यात पूर आला आहे. त्यामुळे 4 लाख 23 हजार नागरिकांना आपले घर सोडावे लागले आहे. प्रशासनाने त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे. तसेच या पुरामुळे १६ लाख 730 हेक्टरवरील पीक नष्ट झाले आहे. पावसाचे प्रमाण इतके आहे आहे की 64 हून अधिक रस्ते व 12 पूल पाण्याखाली गेले आहेत. या पूर्वी राज्याची राजधानी ईटानगरमध्ये पावसामुळे दरड कोसळली होती. त्यात एका व्यक्तीचा मृत्यूही झाला होता.

आपली प्रतिक्रिया द्या