भंडारा जिल्ह्याच्या वैनगंगा नदीवर नवीन पूल उभारण्याचे काम सुरू आहे. या बांधकामासाठी अनेक मोठ्या मशीन आणण्यात आल्या आहेत. दोन दिवसापासून जिल्ह्यात अतिवृष्टी होत आहे. या मुसळधार पावसाने वैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. नदीची पाणीपातळी वाढल्याने या नदीच्या प्रवाहात बांधकामासाठी वापरण्यात येणारी क्रेन वाहून गेली आहे. पुराच्या पाण्यात क्रेन वाहून गेल्यानंतर तिचा शोध घेण्यात आला. ही क्रेन सुमारे 8 किमी अंतरांवर प्रवाहासोबत वाहत गेली होती. अखेर तेथून या क्रेनला पाण्याबाहेर काढण्यात आले आहे.