देवगडला पावसाने झोडपले, बळीराजा सुखावला

14

सामना प्रतिनिधी । देवगड

देवगड तालुक्यात मंगळवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले. मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी रस्त्यावर पाणी आल्याने वाहतुक कोंडी निर्माण झाली होती.

पावसाच्या दमदार सरीने भात लावणीच्या प्रतीक्षेत असलेला बळीराजा सुखावला आहे. मुसळधार पावसाने पुन्हा एकदा शेतीच्या कामांना वेग येणार असून भात लावणीच्या कामांना सुरुवात होणार आहे. गेली काही दिवसापासून तालुक्यात ठिकठिकाणी पावसाची ये-जा सुरू असल्याने बळीराजा चिंतातूर बनला होता. मात्र दोन मंगळवारच्या मुसळधार पावसामुळे बळीराजाला दिलासा मिळाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या