कश्मीर खोऱ्यावर पुराचे संकट

38
सामना ऑनलाईन। श्रीनगर
जम्मू-कश्मीरमध्ये हिमवृष्टी नंतर आता पावसाने थैमान घातले आहे. निसर्गाचा प्रकोप झाल्यामुळे कश्मीर खोऱ्यातील नद्या धोक्याच्या पातळीजवळ पोहोचल्या आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून नदी पात्राजवळ राहणाऱ्यांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे. पाण्याच्या वाढत्या पातळीवर सरकारी यंत्रणांचे लक्ष असून आपत्काळासाठी मदत पथक सज्ज झाले आहे. जागोजागी पाणी साठल्याने कश्मीरमध्ये मोठ्या प्रमााणावर वाहतूक कोंडी झाली आहे.
महिन्याभरापासून जम्मू-कश्मीरमधील हवामानात सातत्याने बदल होत आहे. फेब्रुवारीच्या सुरुवातीला दिवसा उकाडा आणि रात्री हिमवृष्टी असे येथील हवामान होते. पण मार्च सुरू होताच वातावरणात कमालीचा बदल झाला असून २४ तास होणाऱ्या हिमवृष्टीमुळे जम्मू- कश्मीरमध्ये ऐन उन्हाळ्यात कडाक्याची थंडी पडली आहे. यामुळे रस्त्यावर जागोजागी  बर्फ साठल्याने नागरिकांना घराबाहेर पडणेही मुश्किल झाले. पण आता हिमवृष्टीबरोबरच जोरदार वाऱ्यासह पाऊस कोसळू लागल्याने कश्मीर खोऱ्यातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. याच पार्श्वभूमीवर जम्मू-कश्मीरमधील शाळा-कॉलेज १० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्यात आली आहेत.
आपली प्रतिक्रिया द्या