धुवांधार पावसाने उडवली कोल्हापुरकरांची दाणादाण

33

सामना प्रतिनिधी । कोल्हापूर

वीजांच्या गडगडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह आलेल्या धुवांदार पावसामुळे रविवारी कोल्हापुरकरांची पुरती दाणादाण उडाली. अचानक आलेल्या पावसामुळे सामान्य नागरिकांची तारांबळ उडाली.

दोन दिवसांपासून उघडीप दिलेल्या पावसाचे रविवारी पुन्हा आगमन झाले. मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचले आणि काही घरात पाणी शिरले. धुवांधार पावसामुळे करवीर निवासिनी श्री. अंबाबाई देवी मंदिराच्या आवारात गुडघाभर पाणी साचले होते. त्यामुळे नवरात्री निमित्त मंदिरात अंबाबाईच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांचे प्रचंड हाल झाले.
kol-rain

आपली प्रतिक्रिया द्या