पंढरपूर, सांगोला, माळशिरसमध्ये ‘ढगफुटी’, नदी, नाले, ओढ्यांना पूर; चालकासह कार वाहून गेली

काल रात्री धो धो कोसळणाऱ्या पावसामुळे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, सांगोला आणि माळशिरस या तीन तालुक्यातील काही गावांमध्ये पाणीच पाणी झाले आहे. या पाण्यात एक कार वाहून गेली असून कार आणि चालक दोघेही बेपत्ता आहेत.

दरम्यान, कोरडे पडलेले गावचे ओढीनाले तुडुंब भरुन वहात आहेत या पाण्यामुळे शेतातील उभी पिके वाहून गेली असून डाळींब, द्राक्षे आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

काल बुधवारी सायंकाळी 5 च्या सुमारास रिमझिम पावसाळा सुरुवात झाली आणि मध्यरात्री धुवांधार बरसला. सकाळी जेंव्हा लोकांनी पाहिले तेंव्हा नदी, ओढे नाल्यांना पूर आलेला होता. 1999 मध्ये अशा प्रकारे पाऊस पडल्याचे या भागातील लोकांनी सांगितले.

गेल्या दोन तीन वर्षांपासून या भागात समाधानकारक पाऊस नव्हता मात्र यावेळी जास्तच मेहरबानी केल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या