आसाममध्ये बचावकार्य करताना दोन पोलीस वाहून गेले

आसाममध्ये पावसाने थैमान सुरू असून आतापर्यंत लाखो लोकांना मोठा फटका बसला आहे. आपत्ती निवारण आणि पोलीस दलाच्या मदतीने वेगाने बचाव आणि मदतकार्य सुरू आहे. रविवारी रात्री नागाव जिल्ह्यातील पुरात अडकलेल्या लोकांच्या मदतीसाठी गेलेल्या कामपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी सॅम्युअल काकोती आणि एक पोलीस शिपाई प्रवाहात वाहून गेले. आज त्यांचे मृतदेह सापडले.