हाती आलेलं निसर्गाच्या लहरीपणानं गेलं, काढणीला आलेली पिके भुईसपाट

38

सामना प्रतिनिधी । परभणी

जिल्ह्यातील सेलू, मानवत, जिंतूर या तालुक्यातील काही गावात आज दुपारी अचानक आलेल्या गारपिटीने रब्बी पीकांचे नुकसान झाले. काढणीला आलेला गहू, ज्वारी, हरभरा, करडी या पीकांचे गारपीटीमुळे नुकसान झाले. प्रशासनाने तातडीने पाहणी करुन पंचनामे करावेत व शेतकऱ्यांना मदत मिळवून द्यावी, अशी मागणी शेतकरीवर्गातून जोर धरू लागली आहे.

सेलूमध्येही तुफान गारपीट
सेलू शहरासह तालुक्यात आज दुपारी साडेतीनच्या सुमारास झालेल्या तुफान गारपिट व वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने शेतकऱ्यांची पिके वाया गेली आहेत. गारपिटीचा रब्बीसह बागायती पिकांना मोठा फटका बसला आहे. कापूस, ज्वारी, हरभरा या पिकांना मोठा फटका बसला तर बागायती पिकांचे देखील अतोनात नुकसान झाले आहे.

parbh

जिंतूर तालूकात गारासह पाऊस
पहाटे साडपाचपासून शहरासह तालुक्याच्या बहुतेक भागात पावसाळी वातावरण तयार होऊन ढगांचा गडगडाट सुरू झाला. सहासाडेपासून सर्वत्र कमीजास्त प्रमाणात हलक्या पावसाच्या सरी पडल्या. यावेळी बेलखेडा, कोठा, वाघी-धानोरा, चारठाणा, बामणी, वझर (बु.) व इतर काही गावात बोराच्या आकाराएवढ्या गारा पडल्या. तसेच यावेळी झालेल्या वाऱ्यामुळे काढणीला आलेला हरबरा, ज्वारी व इतर उभ्या पिकांचे नुकसान झाले.

par

चारठाणा परिसरातील गारपीट
चारठाणा येथून जवळच असलेल्या वझर, चारठाणा येथे आवकाळी गारांचा पाऊस पडला. गारांचा आकार बोर व लिंबा ऐवढा होता. त्यामुळे रब्बी पीकांचे मोठे नुकसान झाले आहे. काही शेतकऱ्याच्या डोक्यात व पाठीत गारा लागल्यामुळे ते जखमी झाले. वादळी वाऱ्यासह गारांच्या पावसामुळे शेतातील उभी गहु, हरभरा, ज्वारी आदी पीकांचे नुकसान झाले. तसेच आंब्याचे मोहर मोठ्या प्रमाणात गळून पडला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या