खो-खोमध्ये महाराष्ट्राची झेप

251

‘खेलो इंडिया युथ गेम्स’च्या तिसऱया पर्वात महाराष्ट्राने अपेक्षेप्रमाणे खो-खोमध्ये विजेतेपदाच्या दिशेने वाटचाल करताना चारही गटांत उपांत्य फेरी गाठली. मुलींच्या 17 वर्षांखालील गटात महाराष्ट्राने गुजरातचा

10-6 असा एक डाव 4 गुणांनी पराभव केला. मुलांमध्ये महाराष्ट्राने कर्नाटकवर 10-4 अशी एक डाव 6 गुणांनी मात केली. मुलांच्या 21 वर्षांखालील गटात महाराष्ट्राने आंध्र प्रदेशचा 13-12 असा तीन मिनिटे राखून पराभव केला. मुलींमध्ये महाराष्ट्राने आंध्र प्रदेशला 11-6 असे एक डाव 6 गुणांनी पराभूत केले.

वेटलिफ्टिंगमध्ये महाराष्ट्राच्या संकेत सरगरला सुवर्ण

‘खेलो इंडिया युथ गेम्स’च्या तिसऱया पर्वात महाराष्ट्राच्या संकेत सरगर याने वेटलिफ्टिंगमधील कुमारांच्या 55 किलो गटात सुवर्णपदक मिळविताना स्नॅचमध्ये 107 किलो वजन उचलताना प्रशांत कोळी या आपल्या सहकाऱयानेच नोंदविलेला 104 किलो हा राष्ट्रीय विक्रम मोडला. त्याने एकूणात 239 किलो वजन उचलीत ओडिशाच्या मुना नायक याचा 235 किलो हा विक्रमही मोडला. सरगर याचे ‘खेलो इंडिया’मधील पदार्पणातच विजेतेपद आहे. नायक (235 किलो) याला येथे रौप्यपदक मिळाले तर महाराष्ट्राच्या प्रशांत कोळी याने कास्यपदक (231 किलो) मिळवले.

आपली प्रतिक्रिया द्या