आश्चर्य ! ऑनलाईन ओळखीतून पैशांची मदत केली, विवाहित महिलेचे प्रेम जुळले

विवाहित महिलेची एका पुरुषासोबत ऑनलाईन ओळख झाली. या महिलेचे प्रेम प्रकरण हा सध्या चर्चेचा विषय असून तिने तिची प्रेमकहाणी चिनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. तिच्या या व्हिडियोला अधिकाधिक व्ह्यूज मिळत आहेत.

32 वर्षीय ही महिला चीनमधील हुनान प्रांतातील आहे. ती विवाहित असून तिला तीन मुले आहेत. गेल्या महिन्यात या महिलेची दक्षिण चीनमधील फुजियाना प्रांतातील एका व्यक्तिसोबत ऑनलाईन ओळख झाली. तिच्या प्रियकराविषयी ती सांगते की, त्यांच्या मैत्रीचे काही दिवसांतच प्रेमात रुपांतर झाले. त्यानंतर तिच्या आयुष्यात आलेल्या संकटावेळी याच प्रियकराने तिला आर्थिक मदत केली होती. त्या व्यक्तिने तिला 200,000 युआन (सुमारे 63 लाख रुपये) दिले. यामुळे संकट दूर होऊन माझे आयुष्य मार्गी लागले. माझी तीनही मुले दत्तक घेण्याचे वचनही त्याने मला दिला आहे. त्यामुळे त्याच्या सोबत राहण्याचा मी निर्णय घेतला आहे. मध्या मी आणि माझ्या तीन मुलांसह त्याच्यासोबत आनंदाने जीवन जगत आहोत.

साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या बातमीनुसार, महिलेने प्रियकरासोबत राहायला गेल्याचा व्हिडियो चिनी सोशल मिडियावर शेअर केला आहे. या व्हिडियोमध्ये ती आणि तिचा प्रियकर त्यांच्या तीनही मुलांसोबत बाजारात खरेदी करणे, फिरणे आणि खेळणे यासारखी दैनंदिन कामे करताना दिसत आहेत. त्यांच्या मध्ये चांगले बॉंडिंग झाले असल्याचेही या व्हिडियोमध्ये दिसत आहे.

महिलेने शेअर केलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत 35 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. यासोबतच हजारो लोकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही लोकांनी या दोघांना पुढील आयुष्यासाठी ‘शुभेच्छा’ दिल्या आहेत, तर काहींनी प्रेमात फसवणूक झाल्याची जुनी उदाहरणे देत काळजी घेण्याचा सल्लाही दिला आहे.