हिरो हिरालालच्या अजब भेळीने वेड लावले

चटपटीत भेळ म्हटली की कुणाच्याही तोंडाला पटकन पाणी सुटायलाच हवे. पण बिहारच्या पाटणा शहरातील अशोक राजपथ रस्त्यावरील एका भेलपुरीवाल्याने आपल्या अजब नावाच्या खाद्यपदार्थांनी बिहारवासीयांना वेडे केले आहे.

भाजलेले चणे, मका, पोहे आणि चिवडय़ाचा चुरा अशा खाद्यपदार्थांपासून बनवलेल्या चटपटीत भेळीला हिरालाल यांनी ’हसीना भुजा’, ’हसीना मान जायेगी’ अशी अजब गजब नावे दिली आहेत. त्यांच्या हातची अफलातून चव चाखणाऱ्या ग्राहकांनी त्यांना प्रेमाने ’हिरो हिरालाल’ असे नाव ठेवले आहे.

एकदा एका पोलीस अधिकाऱ्याने त्यांच्या खाद्यपदार्थांची हसीनावरून सुरू झालेली नावे पाहून हिरालाल यांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावून घेतले होते. पण ही सर्व चटपटीत भेळीची नावे आहेत हे कळल्यावर तो अधिकारीही हिरालाल यांच्या हसीना भेळीचा चाहता बनला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या