दारूच्या नशेत ठोकले हर्शल गिब्सने शतक !

33

सामना ऑनलाईन । मुंबई

क्रिकेट म्हटलं की तिथे काहीही होऊ शकते. असाच एक अनपेक्षित खुलासा दक्षिण आफ्रिकेचा स्फोटक खेळाडू हर्शेल गिब्सने केला आहे. २००६ मधील ऑट्रेलियाविरूद्धचा ‘तो’ सामना सर्वानाच आठवत असेल, ज्या सामन्याने  ४३४ धावांचं आव्हान दक्षिण आफ्रिकेने सहज पार केले होते. तो सामना दक्षिण आफ्रिकेला जिंकवून देण्यात हर्शेल गिब्सचा मोठा वाटा होता. त्या सामन्यात १७५ धावांची केलेली खेळी आपण दारूच्या नशेत केली असल्याचा खुलासा गिब्सने केला आहे.
‘ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्याच्या आधीच्या रात्री मी खूप दारू प्यायली होती. तो हँगओव्हर दुसऱ्या दिवशीही काही प्रमाणात होता. ज्यावेळी मी फलंदाजीसाठी उतरलो तेव्हा अर्ध्या नशेतच होतो आणि त्या अवस्थेतच मी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना ठोकून काढले, असं स्पष्टीकरण हर्शेल गिब्सनं आपल्या ‘टू द पॉईंट :  द नो- होल्ड्स बेअर्ड ऑटोबायोग्राफी’ या आत्मचरित्रात केले आहे.

हर्शेल गिब्सच्या शतकी खेळीच्या जोरावर द. आफ्रिकेने विश्वविक्रम रचला होता. त्याने अवघ्या १११ चेंडूत १७५ धावा केल्या होत्या. त्याची ही खेळी आजही अनेकांच्या स्मरणात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या