पाकडे टरकले; तिरंग्यात छुपा कॅमेरा लपवल्याचा केला आरोप

55
सामना ऑनलाईन। नवी दिल्ली
हिंदुस्थान-पाकिस्तान सीमेवरील अटारी येथे फडकण्यात आलेला सर्वात उंच तिरंगा बघून पाकड्यांची चांगलीच टरकली आहे. या तिरंग्यात छुपा कॅमेरा असून त्याद्वारे हिंदुस्थान पाकिस्तानमधील हालचाली टिपत आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. मात्र हा  आरोप बिनबुडाचा असल्याचे सष्ट करीत हिंदुस्थानने हा दावा फेटाळून लावला आहे.
अटारी सीमेवर नुकताच ११० मीटर उंट ध्वजस्तंभ उभारण्यात आला असून त्यावर ३६० फूट उंच आणि ४२ मीटर रुंद असा ६५ किलो वजनाचा तिरंगा फडकवण्यात आला आहे. देशातील सर्वात उंच तिरंगा म्हणून हा तिरंगाओळखला जातो. सीमेवर मोठ्या डौलाने फडकणारा हा तिरंगा लाहोरमधूनही दिसतो, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे पाकिस्तान चांगलाच घाबरला आहे.
हिंदुस्थानच्या अनोख्या उपक्रमाला विरोध करण्यासाठी पाकिस्तानने आरोप करण्यास सुरुवात केली आहे. लाहोर आणि त्याच्या आजूबाजूच्या भागातील हालचाली टिपण्यासाठीच हिंदुस्थानने एवढा उंच झेंडा उभारल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्याकडे पाकच्या सुरक्षा रक्षकांनी याबददल विचारणा केली असून फ्लॅग मिटींग मध्ये या मुद्यावर चर्चा करणार असल्याचे म्हटले आहे.
सीमेवर कुठल्याही वास्तूची उंची १५० मीटरहुन अधिक असता कामा नये असा नियम असताना हिंदुस्थानने हा नियम मोडून तिरंगा उभारल्याचा आरोप पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी केला आहे. पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी या तिरंग्याचा फोटोही काढल्याचे जवानांनी सांगितले आहे. मात्र हिंदुस्थानने पाकिस्तानचा आरोप खोटा असल्याचे सांगत हा दावा फेटाळून लावला आहे.
आपली प्रतिक्रिया द्या