किरीट सोमय्यांना हायकोर्टाचा दणका; न्यायालयीन चौकशीचे दिले निर्देश

भाजपचे वादग्रस्त नेते किरीट सोमय्या यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून चांगलाच दणका मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयानं त्यांच्या न्यायालयीन चौकशीचे निर्देश दिले आहेत. फसवणूक प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्या विरोधात न्यायालयीन आदेश जारी करण्याच्या प्रक्रियेची प्रत कशी मिळवली याची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. पुण्याचे मुख्य जिल्हा न्यायाधीशांकडून ही चौकशी करण्यात येणार आहे.

दरम्यान, न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठाने मुश्रीफ यांना पुढील सुनावणीच्या तारखेपर्यंत 24 एप्रिल 2023 पर्यंत सक्तीच्या कारवाईपासून संरक्षण दिले आहे.